जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही...; बाबांच्या आठवणीने भावूक झाला रितेश देशमुख

By रूपाली मुधोळकर | Published: October 9, 2020 10:33 AM2020-10-09T10:33:55+5:302020-10-09T10:35:41+5:30

रितेशने सोडला मांसाहार, ब्लॅक कॉफीचाही त्याग...

kaun banega crorepati12 promo featuring riteish deshmukh and dr sunil shroff | जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही...; बाबांच्या आठवणीने भावूक झाला रितेश देशमुख

जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही...; बाबांच्या आठवणीने भावूक झाला रितेश देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देयावर्षाच्या सुरुवातीलाच रितेश व जेनेलिया यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला होता. याबद्दलची पोस्टही त्यांनी शेअर केली होती.

कौन बनेगा करोडपती’चा नवा सीझन सुरु झालाय. आज शुक्रवारी केबीसीच्या ‘करमवीर’ या स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनचे  संस्थापक आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ सुनील श्रॉफ दिसणार आहेत. मोहन फाऊंडेशन गेल्या दोन दशकांपासून अवयवदानासंदर्भात  काम करत आहे. याच एपिसोडमध्ये आणखी एक खास चेहरा दिसणार आहे. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याचा. श्रॉफ यांच्याबरोबर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून रितेश देशमुख केबीसीच्या हॉटसीटवर बसून खेळताना दिसणार आहे. अलीकडे रितेश व त्याची पत्नी जेनेलिया यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला होता. केबीसीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये रितेश या संकल्पामागचा उद्देश सांगताना दिसणार आहे. आपल्या दिवंगत पित्याच्या आठवणीने भावूक झालेला रितेश यावेळी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


 
 केबीसीच्या या ‘करमवीर स्पेशन’ एपिसोडचा प्रोमो अलीकडे प्रदर्शित करण्यात आला आहे.  केबीसीचा हा प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये   डॉ. श्रॉफ यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. रितेश देशमुख वडील माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचा उल्लेख करतो, तो भावूक क्षणही या प्रोमोमध्ये आहे.  विलासराव आणि रितेशचा एक फोटो लक्षवेधी आहे. या प्रोमोमध्ये रितेश वडिलांबद्दल बोलतो आणि त्याचे शब्द भावूक करतात.
‘ त्यावेळी अवयव दान केले असते तर कदाचित वडिलांना वाचवता आले असते, असे रितेश यात म्हणतो. ‘काहीतरी केले पाहिजे, असे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात होते. जिवंतपणी मी माझ्या वडीलांसाठी काही करू शकलो नाही. त्यामुळे मी माझे शरीर तंदुरूस्त ठेवतो..., असे रितेश या प्रोमोमध्ये म्हणतो. 
सध्या खूप कमी अवयव दाता आहेत. अगदी गंभीर परिस्थिती असेल तरच एखादा रिसिपंट या यादीमध्ये वरच्या स्थानावर येतो असेही त्याने नमुद केले आहे.
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील काही दिवसांपूर्वी अवयव दान करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी देखील ट्वीट करून याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.

सोडला मांसाहार, ब्लॅक कॉफीचाही त्याग
यावर्षाच्या सुरुवातीलाच रितेश व जेनेलिया यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला होता. याबद्दलची पोस्टही त्यांनी शेअर केली होती. अवयवदानाचा संकल्प सोडताना रितेशने आणखी एक संकल्प सोडला आहे. तो म्हणजे, स्वस्थ अवयव राखण्याचा. होय, अवयव दान करताना अधिकाधिक स्वस्थ अवयव मागे सोडून जाणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि यासाठी आपल्या शरीराला अधिकाधिक स्वस्थ ठेवणे गरजेचे आहे. हाच एक विचार करून रितेशने मांसाहाराचा त्याग केला आहे. ब्लॅक कॉफी आणि एअरेटेड ड्रिंक्सचाही त्याग केला आहे.

रितेश देशमुखची ‘आयडिया’ची कल्पना! घरात आनंद आणि शांती हवी मग ही पोस्ट वाचा...

SEE PICS : जेनेलिया वहिनी कमबॅकसाठी सज्ज...! आईच्या भूमिका करायलाही तयार

Web Title: kaun banega crorepati12 promo featuring riteish deshmukh and dr sunil shroff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.