riteish deshmukh shares funny tweets gives this remedy for peace of home | रितेश देशमुखची ‘आयडिया’ची कल्पना! घरात आनंद आणि शांती हवी मग ही पोस्ट वाचा...

रितेश देशमुखची ‘आयडिया’ची कल्पना! घरात आनंद आणि शांती हवी मग ही पोस्ट वाचा...

ठळक मुद्देहिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख करोंडोच्या संपत्तीचा मालक आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह आहेत. रितेशने पोस्ट शेअर करायची देर की, ती व्हायरल झालीच म्हणून समजा. सध्या त्याची एक अशीच पोस्ट तुफान व्हायरल होतेय.
रितेशने एक गमतीशीर ट्विट केले आणि त्याच्या या ट्विटवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला. या ट्विटमध्ये रितेशने घरातील टीव्ही संचाचा फोटो शेअर केला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, या टीव्हीचा फेस उलटा दिसतोय. याचे कारण तुम्हाला रितेशच्या ट्विटमध्ये मिळेल.
वास्तूशास्त्रावर विश्वास असणा-यांसाठी... असे लिहित रितेशने ही पोस्ट शेअर केली.

‘वास्तुशास्त्रातील तज्ज्ञांच्या संशोधनानुसार टिव्हीचा फेस उलट्या दिशेने ठेवल्यास घरात आनंद आणि शांती नांदते...’, असे या पोस्टमध्ये लिहिलेले आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच क्रिकेटर युवराज सिंग, उर्मिला मातोंडकर यांनी देखील कमेंट्स केली आहे.
रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो नुकताच टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरसोबत ‘बागी 3’मध्ये दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्याआधी रितेश ‘हाउसफुल 4’मध्ये झळकला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 

हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख करोंडोच्या संपत्तीचा मालक आहे.  रिपब्लिक वर्ल्ड या वेबसाइटनुसार, रितेशची संपत्ती  जवळपास ११४ कोटी रुपये इतकी आहे. एका चित्रपटासाठी तो सर्वसाधारणपणे पाच ते सहा कोटी रुपये मानधन घेतो.

याशिवाय ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाची रितेशची स्वत:ची निर्मिती संस्था आहे. याअंतर्गत त्याने लय भारी,माऊली यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. त्याला आलिशान गाड्यांची फार आवड असून त्याच्याकडे विविध कंपन्यांचे आलिशान कार आहेत. 

2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या सिनेमात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच सिनेमाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. ‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या सिनेमात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 3 फेब्रुवारी 2012 विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.

रितेश देशमुखच्या नव्या फोटोशूटची होतेय सोशल मीडियावर चर्चा, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

OMG!! याला झाले तरी काय? रितेश देशमुखचा नवा लूक पाहून व्हाल हैराण

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: riteish deshmukh shares funny tweets gives this remedy for peace of home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.