रितेश देशमुखच्या नव्या फोटोशूटची होतेय सोशल मीडियावर चर्चा, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:00 AM2020-10-03T06:00:00+5:302020-10-03T06:00:00+5:30

रितेश देशमुखने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्याची चर्चा होताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधत असतो.

नुकतेच रितेशने फोटोशूट केले आहे आणि हे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रितेशच्या या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

रितेशच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या सिनेमात जेनेलिया त्याची हिरोईन होती.

याच सिनेमाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. ‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या सिनेमात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले.

रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो नुकताच टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूरसोबत बागी 3मध्ये दिसला होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

त्याआधी रितेश हाउसफुल 4मध्ये झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवतो आहे आणि त्यासाठी तो खूप उत्सुक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हा रितेशसाठी अत्यंत महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. तसेच मी व नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांसारखे दिग्गज लोक या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.