Kashmera Shah : “मी नशेत...”, प्रचंड ट्रोल झाल्यानंतर 'त्या' व्हिडिओवर कश्मिराचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:00 IST2023-03-03T15:59:52+5:302023-03-03T16:00:24+5:30
Kashmera Shah, Krushna Abhishek : अभिषेक व कश्मिरा हे कपल अलीकडे एका पार्टीत पोहोचलं. या पार्टीतून बाहेर पडतानाचा दोघांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. यावरून कश्मिराला जबरदस्त ट्रोलही केलं जातंय.

Kashmera Shah : “मी नशेत...”, प्रचंड ट्रोल झाल्यानंतर 'त्या' व्हिडिओवर कश्मिराचा खुलासा
Kashmera Shah, Krushna Abhishek : प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मिरा शाह हे टीव्ही इंडस्ट्रीचं बिनधास्त कपल. हे कपल जिथे जातं तिथे त्यांची चर्चा होते. अलीकडे हे कपल एका पार्टीत दिसलं. बिग बॉस १६ च्या स्पर्धकांसाठी सलमान खानने एक पार्टी होस्ट केली होती. अभिषेक व कश्मिराही या पार्टीत पोहोचलं. या पार्टीतून बाहेर पडतानाचा दोघांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. यावरून कश्मिराला जबरदस्त ट्रोलही केलं जातंय.
होय, पार्टीतून बाहेर पडत असतानाच कश्मिरा अभिषेकला लिप लॉक करताना दिसली. कश्मिराने अभिषेकला आपल्याकडे ओढलं आणि त्याला दोनदा किस केलं. यानंतर बिग बॉस १६ फेम प्रियंका चहर चौधरी तिथे आली, तर कश्मिराने तिच्याही गालाचं चुंबन घेतलं. कश्मिराने असं पब्लिकली किस करणं सोशल मीडिया युजर्सला खटकलं. मग काय, लोकांनी कश्मिराला ट्रोल करायला सुरूवात केली. कश्मिरा नशेत आहे. तिला शुद्धच नाहीये, आपण कुठे काय करतोय, याचंही तिला भान नाहीये, असं म्हणत लोकांनी तिला ट्रोल केलं. आता इतकं ट्रोल झाल्यानंतर कश्मिराने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली कश्मिरा...?
मी नशेत होते, मला शुद्ध नव्हती, असं समजून लोक मोकळे झालेत. पण असं काहीही नव्हतं. मला जेटलॅग होता. मी लॉस एंजिल्समधून नुकतीच परतले होते. घरी आले आणि मग लगेच पार्टीला पोहोचले. मी थकले होते. हो, मी एक ग्लास वाईन घेतली होती, पण यामुळे मी शुद्ध हरपेल, असं मला तरी वाटत नाही. होय, मी अभिषेकला किस केलं, पब्लिकली त्याच्यासोबत रोमॅन्टिक झाले, कारण मी तीन आठवड्यांपासून त्याला भेटले नव्हते. मी त्याला मिस करत होते. त्यामुळे मला त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावासा वाटला. मला राहावलं नाही. तो व्हिडिओ पाहून अनेकांनी नको त्या कमेंट्स केल्यात.. पण आता नेटकऱ्यांनी खरी गोष्ट समजून घ्यावी,असं कश्मिरा टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाली.