पिंक बिकिनीमध्ये 'संस्कारी बहू' एरिका फर्नांडिसचा हा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:24 AM2019-09-05T01:24:13+5:302019-09-05T01:26:01+5:30

व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असून तिच्या फोटोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

kasautii zindagii kay Prerna Aka Erica Fernandes Looks Sizzling In Pink Bikini | पिंक बिकिनीमध्ये 'संस्कारी बहू' एरिका फर्नांडिसचा हा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली

पिंक बिकिनीमध्ये 'संस्कारी बहू' एरिका फर्नांडिसचा हा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली

googlenewsNext

एरिका फर्नांडिस कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनत चालली आहे. मालिकेत ती प्रेरणा ही भूमिका साकारत आहे. ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिंदास आहे. नुकतेच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला . हा फोटो पाहताच एरिका ट्रोल झाली आहे. तिचा हा फोटो पाहून युजर्स खिल्ली उडवत आहे. एका युजरने तर जिराफ वाटतेस असे म्हटले आहे. 


शेअर केलेल्या फोटोत एरिकाने गुलाबी रंगाची बिकीनी घातल्याचे पाहायला मिळत आहे.  या फोटोला एरिकाने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. तिने म्हटले आहे की, नेगेटिविटीला दूर ठेवा आणि आपला दिवस सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. सध्या एरिका  मालदीव वेकेशन एन्जॉय करत आहे. व्हॅकेशन दरम्यानचे तिचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असून तिच्या फोटोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

काही दिवसांपूर्वी एरिका आऊटडोअर शूटसाठी विदेशात गेली होती. यादरम्यान एरिकाने धम्माल मस्ती केली. याचे काही फोटो एरिकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसतेय. या फोटोंत एरिका कमालीची हॉट दिसतेय, हे सांगण्याची गरज नाही. ‘आयुष्य बदलण्यासाठी कुठलेही रिमोट नाही. ते स्वत:च बदलावे लागते,’ असे या फोटोला एरिकाने कॅप्शन दिले होते.  एरिकाचे हे हॉट फोटो वेगाने व्हायरल झाले होते. काहींना ते आवडले तर काहींनी ते पाहून नाक मुरडले होते. 

Web Title: kasautii zindagii kay Prerna Aka Erica Fernandes Looks Sizzling In Pink Bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.