स्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 13:58 IST2019-08-05T13:57:53+5:302019-08-05T13:58:04+5:30

काही दिवसांपूर्वी एरिका आऊटडोअर शूटसाठी विदेशात गेली होती. यादरम्यान एरिकाने धम्माल मस्ती केली. याचे काही फोटो एरिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

kasautii zindagii kay 2s prerna aka erica fernandess latest pictures in black monikini | स्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक 

स्विमिंग पूलमध्ये उतरली एरिका फर्नांडिस; व्हायरल झाला हॉट लूक 

ठळक मुद्देसध्या एरिका ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारतेय.

टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस ‘कसौटी जिंदकी की 2’ या मालिकेत बिझी आहे. पण कितीही बिझी असली तरी स्वत:साठी ती वेळ काढतेच. काही दिवसांपूर्वी एरिका आऊटडोअर शूटसाठी विदेशात गेली होती. यादरम्यान एरिकाने धम्माल मस्ती केली. याचे काही फोटो एरिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसतेय. या फोटोंत एरिका कमालीची हॉट दिसतेय, हे सांगण्याची गरज नाही. ‘आयुष्य बदलण्यासाठी कुठलेही रिमोट नाही. ते स्वत:च बदलावे लागते,’ असे या फोटोसोत एरिकाने लिहिले आहे.


तूर्तास एरिकाचे हे हॉट फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. काहींना ते आवडले तर काहींनी ते पाहून नाक मुरडले. 


हे असले फोटो तुझ्या इमेजला सूट करत नाहीत. विचार कर, असे एका युजरने यावर लिहिले. तर अन्य एका युजरने हे फोटो पाहून संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘मला स्क्रिन दाखवणे आवडत नाही, असे तू एका मुलाखतीत म्हणाली होती, मग आता काय झाले?’ असा सवाल एका युजरने केला.


एकीकडे एरिका या हॉट फोटोंमुळे ट्रोल होत असताना काही जण तिचा बचाव करताना दिसले. ‘अरे कुणीतरी एरिकाला सब्यसाचीचा लहंगा द्या, जेणेकरून ती स्विमिंग करू शकेल,’ असे लिहित तिच्या एका चाहत्याने तिचा बचाव केला.


 सध्या एरिका ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारतेय. सध्या ही मालिका आणि यातील प्रेरणाची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. यापूर्वी एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकली होती.  

Web Title: kasautii zindagii kay 2s prerna aka erica fernandess latest pictures in black monikini