फुल्ल ड्रामा! ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये होणार कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:45 IST2018-12-09T18:43:21+5:302018-12-09T18:45:50+5:30

होय, ताजी बातमी खरी मानाल तर मेकर्सनी या शोमध्ये एक मोठ्ठे सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आहे.

Kasautii Zindagii Kay 2: Muskaan fame Arina Dey roped in to play Hina Khan aka Komolika's sister | फुल्ल ड्रामा! ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये होणार कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री

फुल्ल ड्रामा! ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये होणार कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री

ठळक मुद्दे ‘कसौटी जिंदगी के 2’मध्ये लवकरच कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री होणार आहे. कोमोलिकाची ही बहीण साहजिकच प्रेरणा व अनुरागच्या आयुष्यात नवे वादळ घेऊन येईल.

कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेत सध्या जबरदस्त ड्रामा सुरु आहे. पण या सगळ्यांत या मालिकेतील एक सर्वांत महत्त्वाचे पात्र मिसींग आहे. ते म्हणजे, कोमोलिका. काही भागात कोमोलिका दिसली. पण यानंतर ती गायब झाली तर पुरतीच.

मालिकेची प्रोड्यूसर एकता कपूरने कोमोलिकाच्या पात्रासाठी अभिनेत्री हिना खान हिची निवड केली होती. पण हिना खान सध्या  तिच्या ‘लाईन्स’ या डेब्यू चित्रपटात व्यस्त आहे. त्यामुळे ‘कसौटी जिंदगी की 2’मधून ती गायब आहे. पण आता कोमोलिका दिसो न दिसो पण तिची बहीण मात्र आपल्याला या मालिकेत दिसणार आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर मेकर्सनी या शोमध्ये एक मोठ्ठे सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आहे.  ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये लवकरच कोमोलिकाच्या बहीणीची एन्ट्री होणार आहे. कोमोलिकाची ही बहीण साहजिकच प्रेरणा व अनुरागच्या आयुष्यात नवे वादळ घेऊन येईल. कोमोलिकाच्या बहीणीची ही भूमिका एरिना डे साकारताना दिसेल. ‘कसौटी जिंदगी की 2’चे मेकर्स दीर्घकाळापासून या भूमिकेसाठी चेहरा शोधत होते. अखेर त्यांचा हा शोध एरिनापाशी येऊन थांबला. 

पूर्वी ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत  उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाही भूमिका साकारली होती. आजही उर्वशीला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत.इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते.या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान तर श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन  आहे.

Web Title: Kasautii Zindagii Kay 2: Muskaan fame Arina Dey roped in to play Hina Khan aka Komolika's sister