लेकाला मांडीवर घेऊन कार्तिकीने केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:32 IST2025-06-23T15:30:28+5:302025-06-23T15:32:46+5:30

कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर मुग्धा वैशंपायन कमेंट करत म्हणते...

kartiki gaikwad cute video baby rishank sitting on her lap while her doing song rehearsal | लेकाला मांडीवर घेऊन कार्तिकीने केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ

लेकाला मांडीवर घेऊन कार्तिकीने केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) गेल्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला. १३ मे रोजी तिने लेकाचा पहिला वाढदिवस धडाक्यात साजरा केला. कार्तिकीने लेकाचं नाव 'रिशांक' असं ठेवलं आहे. कार्तिकी प्रेग्नंसीतही गाण्याचे कार्यक्रम करत होती. तसंच बाळाच्या जन्मानंतर तिने लगेच काम सुरु केलं होतं. नुकताच कार्तिकीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती रिशांकला मांडीवर घेऊन गाण्याची रिहर्सल करत आहे. 

कार्तिकी गायकवाडने इन्स्टाग्रामवर खूपच गोड व्हिडिओ शेअर केला आहे. ती स्टेजवर माईकसमोर बसून 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा' हे गाणं गात आहे. बाजूला सर्व वादक बसले आहेत. या सगळ्यात तिच्या मांडीवर बसलेला छोटा रिशांक लक्ष वेधून घेत आहे. कानटोपी, फुल स्वेटशर्ट-पँट आणि शूज असा तो तयार होऊन आईच्या मांडीवर बसला आहे. नुसताच बसला नसून अगदी कुतुहलाने सगळीकडे बघतोय आणि आईचं गाणं ऐकतोय. त्याचे डोळे टुकूटुकू माईककडे बघत आहेत. मध्येच माईकला हात लावण्याचाही प्रयत्न करताना दिसतोय. "रिशांकसोबतची कार्यक्रमाच्या rehearsal च्या वेळची एक गोड आठवण" असं तिने कॅप्शन लिहिलं आहे.

या व्हिडिओवर मुग्धा वैशंपायनने कमेंट करत लिहिले, 'अगं, कसं गोड बघतंय ते'. तर प्रथमेश लघाटेनेही लिहिले,'हाहा..क्लास'. कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेने २०२० साली थाटामाटात लग्न केले. त्यानंतर मागील वर्षी तिने मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी कार्तिकी गायकवाडने तिच्या युट्यूब चॅनलवर 'नीज बाळा' ही अंगाई रिलीज केली होती. यामध्ये तिने लेकाचे नाव उघड केले.कार्तिकी लेकाच्या जन्मानंतर लगेच कामावरही आली. अनेक ठिकाणी तिच्या गाण्याचे कार्यक्रम होतात. आजही गावागावात तिच्या आवाजाची जादू आहे.

Web Title: kartiki gaikwad cute video baby rishank sitting on her lap while her doing song rehearsal