कार्तिक आणि नायरा बनणार नव्या युगातील पालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:40 IST2019-01-02T20:40:00+5:302019-01-02T20:40:00+5:30

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील सुंदर जोडी कार्तिक आणि नायरा हे लवकरच पालकत्वाच्या प्रवासावर जात आहेत.

Kartik and Naira will become parents of new age | कार्तिक आणि नायरा बनणार नव्या युगातील पालक

कार्तिक आणि नायरा बनणार नव्या युगातील पालक

स्टार प्लस वाहिनीवर दीर्घकाळ सुरू असलेली मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील सुंदर जोडी कार्तिक आणि नायरा हे लवकरच पालकत्वाच्या प्रवासावर जात आहेत. हे दोघे टीव्हीवरील पालकांचे स्टिरिओटाईप्स मोडणार असून आजचे तरूण पालक ज्या अनुभवातून जातात तसे अनुभव दाखवणार आहेत.


सूत्रांनुसार, कार्तिक आणि नायरा हे नव्या युगातील पालक असतील. ते दोघेही आपल्या जबाबदाऱ्या अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतील आणि आपल्या पालकत्वाच्या नवीन प्रवासात सक्रिय असतील. अर्थात, ह्या प्रवासातही आपले प्रणयी क्षण चोरण्यास ते विसरणार नाहीत. ह्यातील कायरा चाहत्यांना त्यांना ह्या नवीन रूपात पाहायला निश्चितपणे आवडेल. कार्तिक आणि नायरा यांनी आपल्या अफलातून केमिस्ट्रीने स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. त्यांना पालकत्वाच्या ह्या भावनिक प्रवासातून मार्गक्रमणा करताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 
छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. २ जानेवरी २००९ पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या ९ वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे.
 

Web Title: Kartik and Naira will become parents of new age