फोटोंसाठी रेल्वे रूळावर उभी झाली ही बोल्ड अभिनेत्री! युजर्स म्हणाले, अब बस ट्रेन आ जाए!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:31 IST2019-08-08T12:30:32+5:302019-08-08T12:31:15+5:30

होय, फोटोत ही बोल्ड अभिनेत्री रेल्वे रूळांच्या मधोमध उभी राहून पोज देताना दिसतेय. हे फोटो व्हायरल झालेत आणि लोकांनी तिची मजा घेण्यास सुरुवात केली.

karishma tanna gets trolled for posing on railway tracks | फोटोंसाठी रेल्वे रूळावर उभी झाली ही बोल्ड अभिनेत्री! युजर्स म्हणाले, अब बस ट्रेन आ जाए!!

फोटोंसाठी रेल्वे रूळावर उभी झाली ही बोल्ड अभिनेत्री! युजर्स म्हणाले, अब बस ट्रेन आ जाए!!

ठळक मुद्देकरिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

‘नागीन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हिला नवी ओळख मिळाली. त्याआधी रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीचं छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली. रणबीरनंतर करिश्मा तन्ना आणखी एका सुपरस्टारसोबत दिसली. हा सुपरस्टार म्हणजे रणवीर सिंग. रणवीरसोबत ‘चिंग्स चायनीज’च्या जाहिरातीत ती झळकली. सध्या करिश्मा ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तूर्तास एका फोटोशूटमुळे करिश्मा चर्चेत आली आहे. होय, या फोटोत करिश्मा रेल्वे रूळांच्या मधोमध उभी राहून पोज देताना दिसतेय. या फोटोंमुळे करिश्माला ट्रोलही व्हावे लागले. हे फोटो व्हायरल झालेत आणि लोकांनी तिची मजा घेण्यास सुरुवात केली.

करिश्मा तू काय ‘रेल रोको’ करतेय? असा प्रश्न अनेक युजरनी तिचा विचारला. काहींनी तिला मागे बघ, नाही तर ट्रेन येईल, असा सल्ला दिला आहे.

काहींनी तर यापुढे जात, ‘भगवान आपकी आत्मा को शांती दे’ आणि ‘अब बस ट्रेन आ जाए’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहे. सरकारने कदाचित ट्रेन रोखण्यासाठी करिश्माला तैनात केले, अशी मजेशीर कमेंट एका युजरने लिहिली आहे.

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 

Web Title: karishma tanna gets trolled for posing on railway tracks