करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु 'इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स'शोचे करणार सूत्रसंचालन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:32 IST2017-12-04T07:02:39+5:302017-12-04T12:32:39+5:30
अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अरमान मलिक लवकरच छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत.आगामी शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये त्याची बंगाली ...

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु 'इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स'शोचे करणार सूत्रसंचालन!
अ िनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अरमान मलिक लवकरच छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत.आगामी शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये त्याची बंगाली बाला बिपाशा बासुसोबत येणार आहे.करण सिंग ग्रोव्हर छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाला आणि मग त्याने चित्रपटांकडे लक्ष वळवले.आता कदाचित इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्सचे सूत्रसंचालन करण्यासाठी तो टेलिव्हिजनवर परतणार आहे.एवढेच नाही तर बिपाशा बासुचे हे छोट्या पडद्यावरील पदार्पण असेल.सूत्रांनुसार,करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांना विचारण्यात आले आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.हा शो आपल्या इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स देणार असून त्यांचे ग्रूमिंग खुद्द बॉलिवूचे दिग्गज बिगीज करण जोहर आणि रोहित शेट्टी करतील.करणने जरा नचके दिखा,आयडिया रॉक्स इंडिया, पॉवर कपल इत्यादी शोज्चे सूत्रसंचालन केले असून त्यांचे #MonkeyLove छोट्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.
Also Read:छोट्या पडद्यावर करण जोहर आणि रोहित शेट्टी येणार एकत्र!
करण जोहर आणि रोहित शेट्टी या शोचे परीक्षण करणार आहे.यांच्यासह अनेक सेलिब्रेटी या शोचा भाग असल्याचे कळतंय.आजची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर या शोची एक भाग असावी यासाठी निर्मात्यांनी तिच्याशी चर्चा केली असल्याचे सजतंय.आजवर कधीच छोट्या पडद्यावर झळकली नाही. त्यामुळे करिनाच्या फॅन्सना तिला छोट्या पडद्यावर पाहायला नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री होती आणि त्यातही करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' आणि रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' या चित्रपटात करिनाने काम केले आहे. त्यामुळे त्या तिघांची केमिस्ट्री कार्यक्रमात खूप चांगल्याप्रकारे जमून येणार यात कार्यक्रमाच्या टीमला काहीच शंका नव्हती. त्यामुळे करिनाच या कार्यक्रमाचा भाग असावी यासाठी ते प्रयत्न करत होते. पण करिनाकडे सध्या तारखा शिल्लक नसल्याने तिने या कार्यक्रमासाठी नकार दिला आहे. आता तिच्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शिका गौरी शिंदेला या कार्यक्रमासाठी विचारण्यात आले आहे. गौरीने या प्रस्तावावर काय निर्णय दिला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.गौरी शिंदेने 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाद्वारे तिच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी अनेक वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकली. गौरीच्या 'डिअर जिंदगी' या दुसऱ्या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते.'इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्स' हा टॅलेन्टवर आधारित कार्यक्रम असून या शोच्या विजेत्याला थेट बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.