प्रायव्हेट लिफ्ट, स्विमिंग पूल अन् बरंच काही..! करण कुंद्राने खरेदी केला आलिशान फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:00 PM2023-09-26T12:00:17+5:302023-09-26T12:02:39+5:30

गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशची चाहत्यांनी काढली आठवण

Karan Kundra bought a luxurious flat in bandra Mumbai girlfriend tejaswi prakash was missing | प्रायव्हेट लिफ्ट, स्विमिंग पूल अन् बरंच काही..! करण कुंद्राने खरेदी केला आलिशान फ्लॅट

प्रायव्हेट लिफ्ट, स्विमिंग पूल अन् बरंच काही..! करण कुंद्राने खरेदी केला आलिशान फ्लॅट

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील सध्याचा चर्चेतला अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही आयुष्यामुळे तो प्रसिद्धीझोतात येतो.  आगामी 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमात तो दिसणार आहे. शिवाय तेजस्वी प्रकाशसोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे. आता करणने आणखी एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मुंबईच्या बांद्रा या पॉश एरिआत त्याने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

करण कुंद्राने काल इन्स्टाग्रामवर नवीन घरातील गृहप्रवेश पूजेचे फोटो शेअर केले. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत होतं. केशरी रंगाचा कुर्ता परिधान करत करणने गुरुजींच्या हस्ते विधीवत पूजा केली. नव्या घरात होमहवनही केले. या आनंदाच्या प्रसंगी करणची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश मात्र दिसली नाही. करणने व्हिडिओतून नव्या घराची झलक दाखवली आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, करणने हा नवा फ्लॅट तब्बल २० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. अपार्टमेंटमध्ये सी फेसिंग व्ह्यू, एक प्रायव्हेट लिफ्ट आणि स्विमिंग पूलही आहे. व्हिडिओमध्ये सजलेले स्वयंपाकघर, संगमरवरी टाईल्स, कंफर्टेंबल फर्निचर आणि सुंदर इंटिरियर डिझाईन दिसत आहे. 

करण कुंद्रा बिग बॉस 15 मध्ये सहभागी झाला होता. तिथेच त्याची आणि तेजस्वी प्रकाशची लव्हस्टोरी सुरु झाली. घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं टिकून राहिलं. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. 'तेजरान' नावाने त्यांना सोशल मीडियावर ओळखलं जातं. तेजस्वीनेही याआधी गोव्यात फ्लॅट खरेदी केला होता. याशिवाय तिने दुबईतही घर खरेदी केलं आहे.

Web Title: Karan Kundra bought a luxurious flat in bandra Mumbai girlfriend tejaswi prakash was missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.