कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 15:07 IST2020-12-11T15:07:15+5:302020-12-11T15:07:39+5:30

कॉमेडियन कपिल शर्माची मुलगी अनायरा नुकतीच एक वर्षाची झाली.

Kapil Sharma's daughter's first birthday photo came out, the photo went viral | कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल

कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो आले समोर, फोटो झाले व्हायरल

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माची मुलगी अनायरा नुकतीच एक वर्षाची झाली. या निमित्ताने कपिल शर्मा आणि त्याच्या कुटूंबियांनी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या बर्थडे सेलिब्रेशनसाठी छान डेकोरेशन करण्यात आले होते. या बर्थडे पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

कपिल शर्माच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमधील अनायराचे गोंंडस हास्य आणि रुपाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्या क्युटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कपिल शर्माने अनायराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना १४ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. या वाढदिवसाचे आणखी एक आकर्षण म्हणजे कपिल, त्याची पत्नी आणि त्याची आई या तिघांनी एक मेसेज लिहिलेले टी शर्ट घातले आहे. ज्यावर 'अनायरा टर्न्स वन' असे लिहिले आहे.

कपिल शर्माची मुलगी स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळतात. कपिल शर्मा देखील आपल्या मुलीचे क्युट व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
 

Web Title: Kapil Sharma's daughter's first birthday photo came out, the photo went viral