अर्चना पूरन सिंगने शेअर केला जुना फोटो, फोटोची तुलना होतेय सानिया मिर्झाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 07:15 IST2019-09-07T07:15:00+5:302019-09-07T07:15:00+5:30

अर्चना पूरन सिंगने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ती खूप चर्चेत आली आहे.

The Kapil Sharma Show’s Archana Puran Singh looks unrecognisable from her modelling days | अर्चना पूरन सिंगने शेअर केला जुना फोटो, फोटोची तुलना होतेय सानिया मिर्झाशी

अर्चना पूरन सिंगने शेअर केला जुना फोटो, फोटोची तुलना होतेय सानिया मिर्झाशी

द कपिल शर्मा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणारी अर्चना पूरन सिंगने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ती खूप चर्चेत आली आहे. या फोटोत तिच्या हातात बॅडमिंटन दिसत आहे. तिच्या हा फोटो ट्रोल झाला असून या फोटोवर मजेशीर कमेंट्स येत आहेत. 

अर्चना पूरन सिंगने नुकताच तिच्या मॉडेलिंगच्या काळातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत तिने मिनी स्कर्ट व टॉप परिधान केला आहे. अर्चनाने हा फोटो शेअर करत लिहिलं की, मला माहित नाही हा फोटो कुठं काढला आहे. जाहिर आहे की एक जमाना होऊन गेला आहे.


अर्चना पूरन सिंगचा हा फोटो पाहून एका युजरने कमेंट करत तिला नाव दिलं सानिया पूरन मिर्झा


अर्चना पूरन सिंगचा हा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे. एका युजरने लिहिलंय की, त्या काळापासून तुम्ही आवडत आहात. काही युजरने हा फोटो कधीचा आहे याचे तर्कवितर्क लावले. एका युजरनं लिहिलं की, पहा पहा अर्चना पूरन सिंगचा जलवा.


अर्चना पूरन सिंग सध्या द कपिल शर्मा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. यापूर्वी अर्चना कॉमेडी सर्कसमध्ये दिसली होती. काही दिवसांपूर्वी ती न्यूयॉर्कला गेली होती.

तिने सांगितलं की तिचा मुलगा तिथे राहतो. त्याला भेटण्यासाठी गेले होते.

Web Title: The Kapil Sharma Show’s Archana Puran Singh looks unrecognisable from her modelling days