Kapil Sharma Wedding: कपिल शर्माच्या घरीही लगीनघाई! या तारखेला चढणार बोहल्यावर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 16:31 IST2018-10-22T16:30:39+5:302018-10-22T16:31:06+5:30

Kapil Sharma Wedding: होय, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या महिनाभरानंतर कपिल शर्मा बोहल्यावर चढणार आहे.

Kapil Sharma to get married on December 12 | Kapil Sharma Wedding: कपिल शर्माच्या घरीही लगीनघाई! या तारखेला चढणार बोहल्यावर!!

Kapil Sharma Wedding: कपिल शर्माच्या घरीही लगीनघाई! या तारखेला चढणार बोहल्यावर!!

यंदा बोहल्यावर चढणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत कॉमेडियन कपिल शर्माचेही नाव आहे. होय, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या महिनाभरानंतर कपिल शर्मा बोहल्यावर चढणार आहे.
कपिल शर्माच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने याचा खुलासा केला आहे. येत्या १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. पंजाबातील जालंधरमध्ये हे लग्न होणार असून या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. अलीकडच्या एका मुलाखतीत यावर्षाअखेरिस लग्न करणार असल्याचे कपिलने सांगितले होते. अद्याप कपिलने लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या लग्नासाठी १२ डिसेंबरचा मुहूर्त पक्का असल्याचे कळतेय. पंजाबी रितीरिवाजानुसार हे लग्न होणार आहे.

 गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.
 गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार असल्याचीही खबर आहे.

 

Web Title: Kapil Sharma to get married on December 12