कपिल शर्माच्या मुलीचा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, दिसतेय खूपच क्यूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:05 IST2020-03-05T13:03:59+5:302020-03-05T13:05:43+5:30

कपिलच्या मुलीचा एक नवा फोटो त्याच्या फॅन्सच्या भेटीस आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

kapil sharma daughter pictures viral on Internet PSC | कपिल शर्माच्या मुलीचा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, दिसतेय खूपच क्यूट

कपिल शर्माच्या मुलीचा फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, दिसतेय खूपच क्यूट

ठळक मुद्देरिया तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला असून तिच्या मांडीवर चिमुकल्या अनायराला आपल्याला पाहायला मिळत आहे.

कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्याला मुलगी झाली असून तिचे नाव अनायरा आहे. तिचे अनेक फोटो आपल्याला कपिलच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. कपिल नेहमीच आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता त्याच्या मुलीचा एक नवा फोटो त्याच्या फॅन्सच्या भेटीस आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

रिया तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला असून तिच्या मांडीवर चिमुकल्या अनायराला आपल्याला पाहायला मिळत आहे. यात अनायराला चेक्सचा शर्ट आणि गुलाबी रंगाची लेगिन्स घातली असून क्यूटसा हेअर बँडदेखील लावला आहे. तसेच तिच्या पायात आपल्याला गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे शूज देखील पाहायला मिळत आहेत. अनायराचा हा फोटो कपिलच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून सध्या याच फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

रियाने या फोटोसोबत लिहिले आहे की, माझी लाडकी अनायरा... तुला खूप सारे प्रेम.... कपिल भैय्या आणि गिन्नी भाभी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा... रिया तिवारी कपिलला भाऊ मानत असून द कपिल शर्मा शोच्या सेटवर ती अनेकवेळा हजेरी लावते. 

गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहीर केले होते.

कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो यांसारखे अनेक हिट कार्यक्रम कपिलने दिले आहेत. त्याने आपल्या कॉमिक टाइमिंगने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असून 'किस किसको प्यार करूं' या सिनेमातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो 'फिरंगी' या सिनेमातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही. पण द कपिल शर्मा शो नेहमीच टिआरपी रेसमध्ये अव्वल असतो. 
 

Web Title: kapil sharma daughter pictures viral on Internet PSC