Kapil Sharma Wedding Anniversary:गिन्नीच्या वडिलांनी धुडकावून लावला होता कपिल शर्माचा लग्नाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 14:14 IST2020-12-12T13:57:29+5:302020-12-12T14:14:40+5:30
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतोय.

Kapil Sharma Wedding Anniversary:गिन्नीच्या वडिलांनी धुडकावून लावला होता कपिल शर्माचा लग्नाचा प्रस्ताव
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करतो आहे. 12 डिसेंबर 2018मध्ये गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केलं. कपिल शर्मा आणि गिन्नीचे लग्न चर्चेत राहिले होते. दोघांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. कपिल शर्माने आपल्या बर्याच मुलाखतींमध्ये गिन्नीसोबतची आपली प्रेमकथा सांगितली आहे. त्याने बर्याचदा सांगितले आहे की जेव्हा आयुष्यात काही चांगले चालत नव्हते अशा वेळी गिन्नीशी लग्न केले होते.
कपिल आणि गिन्नी यांची ओळख २००५ मध्ये एका महाविद्यालयात ऑडिशनच्या दरम्यान झाली होती. त्यावेळी गिन्नी केवळ १९ वर्षांची तर कपिल २४ वर्षांचा होता. काहीच दिवसांत त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
कपिल कमवायला लागल्यानंतर आईला घेऊन गिन्नीच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेला होता. त्यावेळी गिन्नीच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर कपिल त्याच्या कामात व्यग्र झाला तर गिन्नी तिच्या एमबीएच्या शिक्षणात... दरम्यानच्या काळात कपिल मुंबईत राहायला लागला. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
कपिल कामात बिझी असल्याने गिन्नीने त्याला कधी डिस्टर्ब केले नाही. २४ डिसेंबर २०१६ ला कपिलने गिन्नीला फोन करून लग्नासाठी विचारले आणि तिने देखील क्षणात होकार दिला. त्यानंतर दोघे 12 डिसेंबर 2018मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले.