ऑनस्क्रीन मराठी जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, साखरपुड्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:02 PM2023-11-29T16:02:28+5:302023-11-29T16:03:23+5:30

टीव्हीवरील ऑनस्क्रीन जोडी अमृता बने आणि शुभांकर एकबोटे खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

kanyadan fame shubhankar ekbote amruta bane engagement dance video viral | ऑनस्क्रीन मराठी जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, साखरपुड्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

ऑनस्क्रीन मराठी जोडी खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ, साखरपुड्यातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल

टीव्हीवरील ऑनस्क्रीन जोडी अमृता बने आणि शुभांकर एकबोटे खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. या मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारताना त्यांना एकमेकांमध्ये आयुष्यभराचा साथी दिसला.मालिकेच्या शूटिंगदरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. नुकतंच अमृता आणि शुभांकर यांचा साखरपुडा पार पडला. त्यांचा साखरपुड्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

साखरपुडयात अमृताने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर शुभंकरने फिकट हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्नात त्या दोघांनी खास डान्सही केला. किसी होटल मे जाए, लडकी बडी दिवानी है या बॉलिवूड गाण्यांवर अमृता आणि शुभंकर थिरकले. साखरपुडा सोहळ्यातील त्यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

शुभंकर एकबोटे हा दिवगंत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे. त्याने चिठ्ठी, मंत्र, डार्कलाईट, कन्यादान , चौक, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव अशा चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर अमृता बाणेने न्यूज रिपोर्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील 'श्री गुरुदेव दत्त' या मालिकेत तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 'रंग माझा वेगळा', 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Web Title: kanyadan fame shubhankar ekbote amruta bane engagement dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.