औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:55 PM2024-06-04T12:55:23+5:302024-06-04T12:56:10+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live : आतापर्यंत आलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (CHANDRAKANT KHAIRE) (महाविकास आघाडी) थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेल्याचे चित्र आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे (महायुती) पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत... 

Aurangabad Lok Sabha Result Live Sandipan Bhumre on the lead, imtiaz jaleel on the second place Chandrakant Khaire in the third place and Will the coalition take the fort again | औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?

औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?

Aurangabad Lok Sabha Result Live : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसताना दिसत आहे (जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. मात्र मतदारसंघाचे नाव बदललेले नाही). आतापर्यंत आलेल्या निकालात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (CHANDRAKANT KHAIRE) (महाविकास आघाडी) थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेल्याचे चित्र आहे. याशिवाय विद्यमान खासदार इम्तियाज जलील (IMTIAZ JALEEL SYED) (एआयएमआयएम) दुसऱ्या क्रमांकावर तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे (SANDIPAN BHUMARE) (महायुती) पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी आणि एआयएमआयएम अशी तिरंगी लढत झाली होती. आतापर्यंत म्हणजेच १२.३० वाजेपर्यंत आलेलेल्या निकालानुसार, महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे १३०००० मतांसह १९९८७ मतांनी आघाडीवर आहेत. विद्यमान खासदार तथा एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील ११००१३ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर महाविकास आघाडीचे नेते चंद्रकांत खैरे ८४७५७ तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. तर गेल्यावेळी टर्निंगपॉइंट ठरलेल्या हर्षवर्धन जाधव यांना यावेळी आतापर्यंत केवळ १००८० मतेच मिळाली आहेत. तर वंचितचे उमेदवार अफसर खान १७०२३ मतांवर आहेत.   

खरे तर, औरंगाबाद हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्यावेळी एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा जवळपास 5 हजार मतांनी पराभव करत सर्वांनाच धक्का दिला होता. खैरे सलग चार वेळा येथून विजयी झाले होते. तेव्हा ते युतीचे उमेदवार होते. मात्र आता पुन्हा एकदा युती, महायुतीच्या रुपाने पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला खेचून आणताना दिसत आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. येथे साधारणपणे ६३.७ टक्के मतदान झाले होते. यावेळीही औरंगाबाद मतदारसंघात निवडणूक अत्यंत अटीतटीची राहिली. गेल्या वेळी येथे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होती. या युतीचा मोठा फायदा एमआयएमला अर्थात इम्तियाज जलील यांना झाला होता. खरे तर, जलीलांच्या विजयात एक गठ्ठा मुस्लीम मतदानाप्रमाणेच वंचितच्या मतांचाही मोठा वाटा होता.

यावेळी मात्र, एआयएमआयएम आणि वंचित एकत्र नव्हते. वंचितने अफसर खान यांना उमेदवारी दिली होती. यामुळे वंचितचे मतदान आणि काही मुस्लीम मतदान अफसर खान यांच्याकडे वळताना दिसले. याचा फटका इम्तियाज जलील यांना बसताना दिसत आहे. 

Web Title: Aurangabad Lok Sabha Result Live Sandipan Bhumre on the lead, imtiaz jaleel on the second place Chandrakant Khaire in the third place and Will the coalition take the fort again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.