"श्वास रोखून धरायची अन्...", 'कमळी' फेम अभिनेत्रीला लहानपणी झालेला 'हा' गंभीर आजार; थोडं जरी दुर्लक्ष झालं असतं तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:10 IST2025-11-13T15:07:18+5:302025-11-13T15:10:09+5:30
लहानपणी 'या' गंभीर आजाराने त्रस्त होती अभिनेत्री,'तो' प्रसंग सांगताना आई झाली भावुक

"श्वास रोखून धरायची अन्...", 'कमळी' फेम अभिनेत्रीला लहानपणी झालेला 'हा' गंभीर आजार; थोडं जरी दुर्लक्ष झालं असतं तर...
kamali Serial Actress: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे कमळी. अगदी अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली.या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर, निखिल दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर त्याला तोडीत तोड खलनायिका अभिनेत्री केतकी कुलकर्णी साकारली आहे. मालिकेत ती खलनायिका असली तरी तिच्या भूमिकेची चर्चा आहे, तिच्या कामाचं कौतुक होताना दिसतंय.सध्या केतकी एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
केतकीनं लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिनं गाजलेल्या अस्मिता या मालिकेत भूमिका साकारली होती. अलिकडेच केतकी कुलकर्णीने तिच्या आई-वडिलांसह राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी केतकी तिच्या आई-वडिलांना काही प्रश्न विचारले. त्यादरम्यान,केतकीने माझं संगोपन करताना तुम्हाला झालेला त्रास किंवा आव्हान कोणतं? असा प्रश्न तिच्या आई-वडिलांना विचारला. तेव्हा केतकीच्या आई स्वाती कुलकर्णी म्हणाल्या, "तिला एक आजार होता. पाच वर्ष ही कुठे पडली किंवा लागलं तर ही श्वास रोखून धरायची, श्वास घेणं बंद करायची. "
तेव्हा डॉक्टर म्हणाले...
त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या, "बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं होतं. पण त्यावेळी एका डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं,हा स्वभाव असतो. रडका स्वभाव हा तिचा लहानपणासूनच आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ती अपमान सहन करु शकत नाही म्हणून ती रडता रडता श्वास रोखून धरते. ही पहिली स्टेज पण, तुम्ही तिची काळजी घ्या. सगळं तिच्या मनासारखं करा. त्यानंतर मग तुम्ही जसं पाहिजे तसं वळण लावा. "
"मग ते पाच वर्ष आम्हाला तिला वाढवण्यात, शिवाय स्पोर्ट टिचरला सांगण्यात गेली की,तुम्ही तिला जास्त पळवू नका.म्हणून ती स्पोर्ट्समध्ये कमकुवत राहिली.कारण, ती पडली की तिचा श्वास रोखून धरते. हे सगळं शिक्षकांना सांगावं लागलं की तुम्ही तिला स्पोर्ट्समध्ये टाकू नका, जोरात ओरडू नका, ती खबरदारी घ्या. ते करण्यामध्ये पाच वर्ष आम्हाला खूप त्रास झाला.सतत तिचं टेन्शन असायचं."असा खुलासा अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी केला.