कहानी घर घर की फेम लीली पटेल दिसणार मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:36 IST2018-08-07T15:32:13+5:302018-08-07T15:36:26+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना लवकरच एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ असे या मालिकेचे नाव असून या मालिकेत छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Kahaani Ghar Ghar Kii fame Lily Patel in Mein maike chali jaungi tum dekhte rahiyo | कहानी घर घर की फेम लीली पटेल दिसणार मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत

कहानी घर घर की फेम लीली पटेल दिसणार मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत

कहानी घर घर की ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत दादीची भूमिका साकारणाऱ्या लीली पटेल आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. त्यांनी या मालिकेसोबतच कुटुंब, चिडियाँ घर यांसारख्या चित्रपटात तर हसी तो फसी, घायल वन्स अगेन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या आता एका मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना लवकरच एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ असे या मालिकेचे नाव असून या मालिकेत छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेतील काही कलाकरांची निवड झाली असून काही कलाकारांची निवड सध्या केली जात आहे. मालिकेतील सत्या देवी (नीलू वाघेला) या व्यक्तिरेखेच्या आईच्या म्हणजे सावित्री देवीच्या व्यक्तिरेखेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री लीली पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
 
लिली पटेल यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, “सोनीची नवीन मालिका मैं मयके चली जाऊंगी तुम देखते रहियो मध्ये मी नानीच्या भूमिकेत दिसणार आहे. पडद्यावरील माझ्या व्यक्तिरेखेचे नाव सावित्री देवी असून ती खूप सकारात्मक आणि प्रेमळ स्त्री आहे. जीवनात सत्प्रवृत्त राहण्यासाठी ती आपल्या कुटुंबियांना प्रेरणा देते. मी मालिकेत आजीची भूमिका साकारत असल्यामुळे सेटवरील सर्व मंडळी मला नानी या नावानेच हाक मारतात. मी नीलू वाघेलासोबत काही दृश्ये चित्रित केली आहेत. ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली व्यक्ती आहे. पडद्यावर आणि प्रत्यक्षात देखील आमच्यात माय-लेकीचेच नाते आहे.” 
 
‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असली तरी या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण असणार याविषयी निर्मात्यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. 

Web Title: Kahaani Ghar Ghar Kii fame Lily Patel in Mein maike chali jaungi tum dekhte rahiyo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.