'डॉक्टर डॉन' मधील कलाकार कबीर आणि राधाचा 'ट्विनिंग गेम' ऑन पॉईंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 17:26 IST2021-03-20T17:25:44+5:302021-03-20T17:26:27+5:30

देवा आणि डॉलीबाई सोबतच या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर आणि अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हे ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच ऑफस्क्रीन देखील करतात.

Kabir and Radha's 'Twinning Game' on point in 'Doctor Don' Marathi Serial | 'डॉक्टर डॉन' मधील कलाकार कबीर आणि राधाचा 'ट्विनिंग गेम' ऑन पॉईंट

'डॉक्टर डॉन' मधील कलाकार कबीर आणि राधाचा 'ट्विनिंग गेम' ऑन पॉईंट

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. 

असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'डॉक्टर डॉन' मधील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय आणि प्रेक्षकांचे लाडके आहेत. ही मालिका सुरुवाती पासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.देवा आणि डॉलीबाई सोबतच या मालिकेतील प्रेक्षकांची अजून एक आवडती जोडी म्हणजे राधा आणि कबिरची. या भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे अभिनेता अनुराग वरळीकर आणि अभिनेत्री प्रज्ञा चवंडे हे ऑनस्क्रीन जितकी धमाल करतात तितकीच ऑफस्क्रीन देखील करतात. कधी गिटार वाजवून गाण्यांची मैफिल तर कधी सेटवर पक्वान्नांची मेजवानी रंगलेली असते. 

मालिकेत सध्या मोनिका आणि विक्रांतच्या लग्नाची लगबग सुरु आहे आणि लग्न म्हंटल कि लग्नाची जोरदार तयारी देखील आली, लग्नात उठून दिसण्यासाठी भरजरी पारंपरिक कपड्यांची खरेदी सुद्धा आली. तर अशाच एका कार्यक्रमासाठी राधा आणि कबीर यांनी छान निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. राधाने निळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा तर कबीरने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला आहे. 


दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे घालून सोशल मीडियावर त्यांचे फोटोज त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. यात त्यांची जोडी एकदम उठून दिसतेय. त्यांचा हा ट्विनिंग गेम अगदी ऑन पॉईंट असल्याचं कबीर म्हणजेच अनुराग वरळीकर याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या या लुकवर चाहते फिदा झाले असून त्यांचा हा ट्विनिंग गेम देखील प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.  

Web Title: Kabir and Radha's 'Twinning Game' on point in 'Doctor Don' Marathi Serial