'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने या अभिनेत्यासोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:57 PM2023-12-06T12:57:14+5:302023-12-06T13:00:09+5:30

Suruchi Adarkar Wedding : सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतेच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी लग्न केले. त्यानंतर आता अभिनेत्री सुरुची अडारकर हिने मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्यासोबत गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.

'Ka Re Durava' fame actress Suruchi Adarkar secretly tied the knot with the actor, photos surfaced | 'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने या अभिनेत्यासोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने या अभिनेत्यासोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. नुकतेच बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार जोडप्यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. का रे दुरावा फेम अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade)सोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

सुरूची अडारकर आणि पियुष रानडे यांनी नुकतेच लग्न केले आहे. लग्नाचे फोटो अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत पियुष तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, आनंदी दिवस. तिची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.   


पियुष रानडेनं तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
अभिनेता पियुष रानडेचं सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न आहे. पियुषचे पहिले लग्न अभिनेत्री शाल्मली टोळये सोबत झाले होते. काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर१ फेब्रुवारी २०१६ रोजी अभिनेत्याने मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केले. अस्मिता मालिकेच्या सेटवर त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. मात्र हे लग्नदेखील फार काळ टिकू शकले नाही.

वर्कफ्रंट...
'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील अंजली आणि त्यानंतर 'एक घर मंतरलेलं'मध्ये ती दिसली होती. एक घर मंतरलेलेमध्ये तिने गार्गी महाजनची भूमिका साकारली होती. त्यानंतर बराच काळ ती कलाविश्वातून गायब होती. नुकतीच ती बाईपण भारी देवा चित्रपटात पाहायला मिळाली होती. याशिवाय सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेत दिसली होती. तर पियुष रानडेने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने हिंदी मालिकेतही काम केले आहे. लज्जा, एकच ह्या जन्मि जनु, अस्मिता, अंजली, साथ दे तू मला, पिंकीचा विजय असो या मालिकेत पियुषने काम केले आहे. सध्या तो काव्यांजली या मालिकेत काम करताना दिसत आहे. 
 

Web Title: 'Ka Re Durava' fame actress Suruchi Adarkar secretly tied the knot with the actor, photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.