'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:53 IST2025-07-08T14:52:36+5:302025-07-08T14:53:11+5:30
'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं.

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज
'ठरलं तर मग' ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अव्वल असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावते. 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं.
'ठरलं तर मग'च्या टीमकडून जुई गडकरीला वाढदिवसाचं खास सरप्राइज मिळालं. टीमकडून सेटवरच जुईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जुईच्या वाढदिवशी खास केक मागवण्यात आला होता. त्यासोबतच जुईला काही चाहत्यांकडूनही गिफ्ट मिळाले. चॉकलेट बॉक्स, गणपतीची मूर्ती, फोटोफ्रेम असे गिफ्ट देत चाहत्यांनी जुईचा वाढदिवस आणखी स्पेशल केलाय या चाहत्यांना अभिनेत्रीने रिटर्न गिफ्टही दिले.
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. जुईने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'सरस्वती' या मालिकांमध्येही ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी'मध्येही जुई सहभागी झाली होती.