आईला टीव्हीवर पाहता येणार,पण बाहेर अजुनही कोरोना आहे म्हणत जुही परमारची लेक घेतेय तिची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 16:32 IST2020-10-15T16:31:04+5:302020-10-15T16:32:06+5:30

जूही परमार म्हणाली, “मी आता घरी नसल्याने सामयराला माझी उणीव जाणवते, पण मला पुन्हा टीव्हीवर पाहता येणार असल्यामुळे ती खूपच आनंदात आहे.”

Juhi Parmar's daughter Samairra did the cutest thing for her mom on the first day of Hamariwali Good News' shoot | आईला टीव्हीवर पाहता येणार,पण बाहेर अजुनही कोरोना आहे म्हणत जुही परमारची लेक घेतेय तिची काळजी

आईला टीव्हीवर पाहता येणार,पण बाहेर अजुनही कोरोना आहे म्हणत जुही परमारची लेक घेतेय तिची काळजी

नव्या आणि रंजक मालिकेत नामवंत अभिनेत्री जूही परमार ही सासू रेणुकाची भूमिका साकार करणार आहे. तिचे चाहते तिला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक झाले असले, तरी तिची मुलगी समायराही खूप उत्सुक आहे. जूही परमार म्हणाली, “मी आता घरी नसल्याने सामयराला माझी उणीव जाणवते, पण मला पुन्हा टीव्हीवर पाहता येणार असल्यामुळे ती खूपच आनंदात आहे.”

जूहीने जेव्हा समायराला या मालिकेची माहिती सर्वप्रथम दिली, तेव्हाची एक गोष्ट जूहीने यावेळी सांगितली. ती म्हणाली, “मी जेव्हा तिला या मालिकेविषयी आणि त्यातील माझ्या भूमिकेविषयी सांगितलं, तेव्हा तिला आधी खूप आश्चर्य वाटलं. तिला या कोरोना साथीची भीती वाटत होती. तेव्हा मी तिला समजावलं की मी सर्व ती खबरदारी घेईन आणि मला या मालिकेतील रेणुकाची भूमिका खूप पसंत पडल्यानेच मी ही मालिका स्वीकारली आहे, तेव्हा समायराने समजून घेतलं. 

या मालिकेच्या चित्रीकरणाला ज्या दिवशी प्रारंभ होणार होता, त्यादिवशीच्या लेकीने दिलेल्या एका सरप्राईजने तिला सुखद धक्काच बसला.. त्या दिवशी समायराने मला पुन्हा एकदा सर्व खबरदारी घेण्याबद्दल बजावलं आणि मग तिने मला तिचा मास्क आणि सॅनिटायझर दिला. तिची ही कृती माझ्या मनाला स्पर्शून गेली. 

आता मी घरी नसते, तेव्हा माझे आई-वडील समायराची काळजी घेतात. मी घरी आले सर्वप्रथम मी आंघोळ करते, म्हणजे मगच मला समायराला माझ्या मिठीत घेता येतं आणि तिच्यासोबत राहाता येतं.

समायरा आता आपल्या आजी-आजोबांसाठी आमच्या घरी 'हमारीवाली गुड न्यूज'चा प्रीमिअर साजरा करण्याची तयारी करीत आहे.”तुमच्याप्रमाणेच समायराही या मालिकेच्या प्रीमिअरची प्रतीक्षा करीत असली, तरी या मालिकेचे अगदी नावीन्यपूर्ण कथानकामुळे ही मालिका आधीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. 

Web Title: Juhi Parmar's daughter Samairra did the cutest thing for her mom on the first day of Hamariwali Good News' shoot