जज फराह खानची ‘झलक’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 12:41 IST2016-07-29T07:11:07+5:302016-07-29T12:41:07+5:30

'झलक दिखला जा' सिझन - 9 या डान्स रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता लागलीय.. या डान्स शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.सेलिब्रिटी ...

Judge Farah Khan's 'Glance'! | जज फराह खानची ‘झलक’ !

जज फराह खानची ‘झलक’ !

tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'झलक दिखला जा' सिझन - 9 या डान्स रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता लागलीय.. या डान्स शोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.सेलिब्रिटी स्पर्धकसुद्धा शोची जय्यत तयारी करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच एक झलक दिखला जाच्या सेटवरुन एक नवी बातमी समोर आलीय..झलकच्या नवव्या सीझनमध्ये कोरियोग्राफर फराह खान जज म्हणून पाहायला मिळणार आहे. याआधीच्या पर्वातील जज गणेश हेगडेची जागा फराह खान घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्यात. शोचे निर्माते गणेश हेगडेचे नखरे आणि विविध मागण्यांमुळं वैतागले असून त्यांनी आता त्याच्या जागी फराहला जज म्हणून घेण्याचं ठरवलंय. याबाबत फराहशी चर्चाही झाल्याचं खात्रीलायकरीत्या समजतंय. त्यामुळं आता करण जोहर, जॅकलिन फर्नांडिससह फराह खान झलकमध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांना जज करणार आहे.

Web Title: Judge Farah Khan's 'Glance'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.