'जिजाजी छत पर है'मध्‍ये मुरारी घेणार हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:00 IST2018-09-20T13:35:03+5:302018-09-22T06:00:00+5:30

'जिजाजी छत पर है' या मालिकेतील ईलायची, पंचम, मुरारी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक मजेदार गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

"Jijaji is on the roof", the decision will be taken by Murali | 'जिजाजी छत पर है'मध्‍ये मुरारी घेणार हा निर्णय

'जिजाजी छत पर है'मध्‍ये मुरारी घेणार हा निर्णय

'हास्‍याविना दिवस हा व्‍यर्थ दिवस' या जुन्‍या म्‍हणीच्‍या आधारावर सोनी सबवरील मालिका 'जिजाजी छत पर है' प्रेक्षकांना आपल्‍या रोमांचक आणि मंत्रमुग्‍ध पटकथांसह हसवून हसवून लोटपोट करत आहे. या मालिकेतील ईलायची, पंचम, मुरारी या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना एक मजेदार गोष्ट पाहायला मिळणार आहे. 
 
'जिजाजी छत पर है' या मालिकेच्या आगामी एपिसोड्समध्‍ये एक रहस्‍यमय महिला घराच्‍या छतावरून इलायचीच्‍या खोलीमध्‍ये जाऊन तिचे केस कापणार आहे. यामुळे मुरारी (अनुप उपाध्‍याय) आणि करुणा (सोमा राठोड) यांना इलायचीची (हिबा नवाब) काळजी वाटणार आहे. त्यामुळे छोटे त्‍यांना सल्‍ला देणार आहे की, मुरारीने एखादे दत्‍तक मूल घेतले पाहिजे, ज्‍यामुळे मुरारी ईलायचीजवळ नसताना ती व्‍यक्‍ती तिची काळजी घेऊ शकेल. छोटे आणि मुरारीची ही चर्चा सुरू असतानाच पंचम (निखिल खुराणा) एका चोराला चोरी करून पळताना पकडणार आहे. त्यामुळे मुरारी आणि करुणाला त्‍यांच्‍या मुलीची काळजी घेण्‍यासाठी तोच योग्‍य व्‍यक्‍ती वाटणार आहे आणि म्‍हणूनच ते पंचमला दत्‍तक घेण्‍याचा निर्णय घेणार आहेत.
 
त्यामुळे आता पंचम दत्‍तक कागदपत्रांवर स्‍वाक्षरी करेल का? इलायची या स्थितीला कशाप्रकारे सामोरे जाईल? हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. याविषयी मुरारीची भूमिका साकारणारा अनुप उपाध्‍याय सांगतो, ''जिजाजी छत पर है या आमच्या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आम्हाला त्यांचे अधिकाधिक मनोरंजन करायला प्रेरणा मिळत आहे. वडिलांसाठी मुली या जीव की प्राण असतात. त्यामुळे मला खात्री आहे की, पालक आगामी एपिसोड्सशी भावनिकदृष्टया नक्कीच जोडले जातील.'' 

'जिजाजी छत पर है' ही मालिका प्रेक्षकांना दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता सोनी सबवर पाहायला मिळते. या मालिकेचे आगामी भाग देखील प्रेक्षकांना आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: "Jijaji is on the roof", the decision will be taken by Murali