'जीजाजी छत पर कोई है'चे नवीन एपिसोड्स रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 11:54 IST2021-07-06T11:49:48+5:302021-07-06T11:54:16+5:30

जीजाजी छत पर है धमाल विनोदी मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. नवीन एपिसोडमुळे रसिकांचे भरघोस मनोरंजन होणार आहे.

Jijaji Chhat Per Hain New Episodes | 'जीजाजी छत पर कोई है'चे नवीन एपिसोड्स रसिकांच्या भेटीला

'जीजाजी छत पर कोई है'चे नवीन एपिसोड्स रसिकांच्या भेटीला

सोनी सबवरील कॉमेडी मालिका 'जीजाजी छत पर कोई है' जुलैपासून नवीन एपिसोड्ससह परतली आहे. शर्मा व जिंदाल परिवार त्‍यांच्‍या अविरत नोक-झोकसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आगामी एपिसोड्स अत्‍यंत भयावह असणार आहेत, जेथे साया तिच्‍याशी वैर करण्‍यासाठी दोन्‍ही कुटुंबांचे जीवन हतबल करण्‍याकरिता कोणतीच कसर सोडणार नाही. आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना शर्मा व जिंदाल परिवाराचे जीवन असह्य करण्‍याचा निर्धार केलेल्‍या  अधिक प्रबळ व भयावह रूप पाहायला मिळणार आहे. 


सीपी व सायाची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ''पटकथा रोमांचक वळण घेत आहे आणि मी आशा करते की, प्रेक्षकांना आगामी पटकथा सर्वसमावेशक व रोमांचक अनुभव देईल. साया कोणतीच कसर सोडत नाही आहे. तिने शर्मा व जिंदालचे जीवन असह्य करण्‍याचे ठरवले आहे, ज्‍यासाठी ती जीजाजी व सीपीची देखील दया करत नाही. साया जीजाजी व सीपीला खजिन्याचा शोध घेण्‍याच्‍या जाळ्यात अडकवते. आगामी कथा कशी असणार आहे हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे, जेथे साया अधिक शक्तिशाली व चपळ बनली आहे. पण बदल्यात जीजाजी व सीपी एकमेकांच्‍या अधिक जवळ येतील. तर मग मालिका पाहत राहा आणि घरामध्‍येच सुरक्षित राहत आमच्‍या मालिकेचे नवीन एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घ्‍या.''

जीजाजीची भूमिका साकारणारा सुभाषिश झा म्‍हणाला, ''आम्‍हाला सेटवर परतण्‍याचा आणि प्रेक्षकांसाठी नवीन एपिसोड्स सादर करण्‍याचा आनंद होत आहे. टीम सेटवर सुरक्षिता व स्‍वच्‍छताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. पहिल्‍यांदाच प्रेक्षकांना जीजाजी आणि सीपी एकत्र असण्‍याचे अनेक सीन्‍स पाहायला मिळणार आहेत. 

जीजाजी व सीपी यांनी नेहमीच त्‍यांच्‍या कुटुंबांमधील विवाद व सततची नोक-झोक पाहिली आहे. हा प्रवास अत्‍यंत लक्षवेधक व प्रोत्‍साहनदायी राहिला आहे. मी जीजाजीची भूमिका साकारण्‍याचा आनंद घेत आहे आणि त्‍यामधून मला चांगले देखील वाटत आहे. मला लोकांना दिवसभरातील व्‍यस्‍त कामानंतर हसवणारी भूमिका साकारण्‍याचे समाधान वाटत आहे. मी सर्व प्रेक्षकांना घरीच राहण्‍याचे आवाहन करतो. मी आशा करतो की, नवीन एपिसोड्ससह आम्‍ही आमच्‍या चाहत्यांशी संलग्‍न होण्‍यासोबत त्‍यांचे मनोरंजन करत राहू.'' 

Web Title: Jijaji Chhat Per Hain New Episodes