'बेरोजगार होते, रुपायाही कमवत नव्हते, टीव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं आपलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 09:40 IST2023-10-27T09:34:41+5:302023-10-27T09:40:26+5:30

संघर्ष हा काही कुणालाच चुकलेला नाही. याला कलाकाराही अपवाद नाहीत.

Jhalak dikhhla jaa 10 actress nia sharma when talks about on her struggle days | 'बेरोजगार होते, रुपायाही कमवत नव्हते, टीव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं आपलं दु:ख

'बेरोजगार होते, रुपायाही कमवत नव्हते, टीव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं आपलं दु:ख

संघर्ष  हा काही कुणालाच चुकलेला नाही. याला सिनेसृष्टी किंवा छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकाराही अपवाद नाहीत. त्यांना ही करिअरच्या सुरुवातीला संघर्ष करावाच लागतो. अनेक महिने काम मिळत नाही. टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मासोबत देखील काही महिने काम मिळत नव्हतं. एका मुलाखती दरम्यान तिने याबाबत भाष्य केलं होतं. 

नियाला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही. नियाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 मध्ये काली - एक अग्निपरीक्षा या टीव्ही शोमधून केली होती ज्यामध्ये तिने अनु नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. पण तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हात. संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अभिनेत्री निया शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, आज जरी ती खूप प्रसिद्ध आहे किंवा तिची फॅन फॉलोइंग मोठी असली तरी  सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप संघर्ष करावा लागला. नियाने सांगितले होते की, एकेकाळी तिच्याकडे काम नव्हते आणि जवळपास नऊ महिने ती बेरोजगार होती. 

नियाने सांगितले होते की, 'एक हजारों में मेरी बेहना है' या मालिकेनंतर तिच्या करिअरमध्ये 9 महिन्यांचा गॅप आला होता, त्या काळात ती मुंबईत एकटी राहत होती. सगळे काही तिच्यासाठी नवीन होते. त्यामुळे इंडस्ट्रीत तिचे काही मित्र वैगरे पण नव्हते.  त्यानंतर नियाने स्वतःवर लक्ष केंद्रित केले, ती बेली डान्स शिकली. अभिनेत्रीने सांगितले की, 9 महिने तिच्याकडे कोणतेही काम नव्हते. याकाळात तिने एक रुपयाही कमावला नाही.  

नियाने प्रसिद्ध टीव्ही मालिका जमाई राजामध्येही काम केले होते, ज्यामध्ये ती अभिनेता रवी दुबेसोबत दिसली होती, या शोमध्ये तिने रोशनी पटेलची भूमिका साकारली होती. निया आता पूर्वीपेक्षा खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Web Title: Jhalak dikhhla jaa 10 actress nia sharma when talks about on her struggle days