'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालालला लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:06 IST2018-09-27T17:03:39+5:302018-09-27T17:06:03+5:30

सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत टप्पूसेनाच्या योजनेनुसार जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Jethalal get lottery in Tarak Mehta Ka Ulta Chashma | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालालला लागली लॉटरी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालालला लागली लॉटरी

ठळक मुद्देजेठालाल थिरकणार बबितासोबत जेठालाल व बबिता 'तुने मारी एन्ट्री और दिल में बजी घंटी' या गाण्यावर करणार डान्स

सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने सेलिब्रेशनचा माहौल आहे. त्यात डॉक्टर हाथी परत आले असून ते लवकरच मालिकेत पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते आपल्यासोबत गणपती बाप्पांनादेखील घेऊन आले आहेत. त्यामुळे गोकुळधाम सोसायटीत सध्या आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. टप्पूसेनाच्या योजनेनुसार जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकुळधाम सोसायटीतील उत्सवात जास्त मजा तर जेठालालची आहे. खरेतर त्याची लॉटरी लागली आहे. या कार्यक्रमात गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशी दमदार परफॉर्मन्स करणार आहेत. त्यात तर जेठालाल स्टेजवर त्याची फेव्हरेट बबितासोबत थिरकताना दिसणार आहे. जेठालाल व बबिता तुने मारी एन्ट्री और दिल में बजी घंटी या गाण्यावर डान्स करणार आहेत. तर अय्यरला स्टेजवर डान्स करण्यासाठी पोपटलाल पार्टनर म्हणून मिळाला आहे. त्यामुळे जेठालाल खूप खूश आहे. जेठालालचे चाहते त्याचा व बबिताचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नीला टेलीफिल्म्स निर्मित तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत या भागाचे प्रसारण १ व २ ऑक्टोबर रोजी सब टीव्हीवर रात्री साडे आठ वाजता होणार आहे.
डॉ. हाथीच्या भूमिकेसाठी निर्मल सोनीची निवड करण्यात आली आहे. कवी कुमार आझाद यांच्याआधी या मालिकेत डॉ. हाथी ही भूमिका निर्मल सोनी साकारत होता. निर्मलने २००८ मध्ये मालिका सोडल्यामुळेच कवी कुमार आझाद यांना ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुरुवातीपासून निर्मलच डॉ. हाथी यांची भूमिका साकारत असला तरी प्रेक्षकांना या भूमिकेत कवी कुमार आझाद अधिक भावले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही भूमिका पुन्हा निर्मल सोनी साकारणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा निर्मलची एंट्री लवकरच होणारआहे. याविषयी तो सांगतो, जग गोल है... यावर आता माझा विश्वास बसला आहे. लोकांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हाथीची भूमिका प्रचंड आवडते. ही भूमिका मला पुन्हा साकारण्याची संधी दिल्याबद्दल या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांचा मी आभारी आहे.

Web Title: Jethalal get lottery in Tarak Mehta Ka Ulta Chashma