डीप नेक स्विमसूटमध्ये जेनिफरचा जलवा, फ्लॉन्ट केला बॅक टॅटू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:34 IST2021-04-08T15:34:03+5:302021-04-08T15:34:32+5:30
Trending on Social media, Jennifer Winget flaunts her tattoo,त्याला कारणीभूत ठरलेत तिचे हे खास फोटो. स्टायलिश पांढऱ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये बोल्ड पोजेस पाहून सारेच फिदा झाले आहेत.

डीप नेक स्विमसूटमध्ये जेनिफरचा जलवा, फ्लॉन्ट केला बॅक टॅटू !
आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.
जेनिफर विंगेट सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्याला कारणीभूत ठरलेत तिचे हे खास फोटो. स्टायलिश पांढऱ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये बोल्ड पोजेस पाहून सारेच फिदा झाले आहेत.
जेनिफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फॅन फॉलोईंग देखील चांगलीच आहे. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. मात्र अनेक वेळा ते इतके बोल्ड असतात कि, तिला ट्रोलचा सामना करावा लागतो.
जेनिफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात. तिच्या फॅन्सानासुद्धा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज भावतो. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या पाठीवरच्या टॅटू आकर्षण ठरतो आहे. तसेही सेलिब्रिटींचे टॅटूप्रेम ही जगजाहीर आहे यांत आता जेनिफरचही टॅटू प्रेम समोर आले आहे.