"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:48 AM2024-04-04T11:48:03+5:302024-04-04T11:48:44+5:30

टीव्हीवरील अंतरा आणि मल्हार रीअल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने लग्नाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 

jeev maza guntala fame yogita chavhan gets emotional said i lost my mom six months ago before meeting saurabh choughule | "सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

"सहा महिन्यांपूर्वी आईचं निधन झालं आणि...", 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण भावुक

'जीव माझा गुंतला' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही जोडी घराघरात पोहोचली. या मालिकेत त्यांनी अंतरा आणि मल्हार भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकली. टीव्हीवरील अंतरा आणि मल्हार रीअल लाइफमध्ये एकमेकांचे पती पत्नी झाल्याने चाहतेही खूश होते. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने लग्नाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 

योगिता आणि सौरभने ३ मार्चला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेत लग्नाची गाठ बांधली. लग्नाच्या या व्हिडिओत योगिताने सौरभबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. याबरोबरच आयुष्यातील घडलेला प्रसंगही तिने सांगितला. "सौरभ माझ्या आयुष्यात येण्याआधी सहा महिन्यांपूर्वीच माझ्या आईचं निधन झालं होतं. मला वाटतं आईनेच त्याला माझी काळजी घेण्यासाठी पाठवलं आहे," हे सांगताना योगिता भावुक झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर सौरभ योगिताला म्हणतो की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन. 

योगिता-सौरभच्या या व्हिडिओत लग्नातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओला त्यांनी "बरोबर एक महिना आधी 'माझं' आणि 'मी'च 'आमचं' आणि 'आपलं' झालं...", असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Web Title: jeev maza guntala fame yogita chavhan gets emotional said i lost my mom six months ago before meeting saurabh choughule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.