असा रंगणार 'जीव झाला येडापिसा' जन्माष्टमी विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 15:08 IST2019-08-24T15:06:48+5:302019-08-24T15:08:27+5:30

'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये मोठ्या धूमधडाक्यात जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. गावातील मंदिरात जन्माष्टमी पार पडणार आहे.

Janmashtami's special episode Jeev Zala Yedapisa | असा रंगणार 'जीव झाला येडापिसा' जन्माष्टमी विशेष भाग

असा रंगणार 'जीव झाला येडापिसा' जन्माष्टमी विशेष भाग

जन्माष्टमी सगळीकडे मोठ्या उत्साहात सगळेच पार पडतात. यादिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये मोठ्या धूमधडाक्यात जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. गावातील मंदिरात जन्माष्टमी पार पडणार आहे.या दिवसानिमित्त मंदिर आणि पाळणा खूपच सुंदर पध्दतीने सजवला आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे.  सोनी आणि सिध्दी खूप सुंदर दिसत असून नृत्य देखील सादर करणार आहेत. पण या शुभक्षणी आत्याबाईंचा मुलगा सरकार सोनीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून सिध्दी त्याला एक सणसणीत कानशिलात मारते. आता हे शिवाला कळल्यावर काय होणार ? आत्याबाईंना हे कळल्यावर त्या हंगामा करणार हे नक्की.

या जन्माष्टमीच्या प्रसन्न वातावरणात घडलेली ही घटना शिवा आणि सिध्दीच्या आयुष्यात कोणत नवीन वादळ घेऊन येईल ? मालिकेमध्ये आता शिवा आणि सिध्दीच्या नात्याबद्दल सोनीला कळाले असून तिने शिवाला सांगितले आहे तीन महिन्यात सिध्दी मला वहिनी म्हणायला परवानगी देणार.  शिवाचे चांगले वागणे हे जरी आत्याबाईंना दिलेल्या शब्दामुळे असलं तरीदेखील शिवाचे प्रत्येक क्षणाला सिद्धीला मदत करणे, तिची बाजू घेणे हे खरोखरच नाटक आहे की त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे ? हे मालिकेच्या आगामी भागात पाहणे रंजक असणार आहे. 

 

Web Title: Janmashtami's special episode Jeev Zala Yedapisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.