​जॅकलिनने साजरा केला द ड्रामा कंपनीच्या सेटवर वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 14:44 IST2017-08-18T09:14:02+5:302017-08-18T14:44:02+5:30

जॅकलिन फर्नांडिसने अल्लादिन या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती हाऊसफुल, मर्डर २, हाऊसफुल २, रेस २ यांसारख्या ...

Jacqueline celebrates birthday of The Drama Company set | ​जॅकलिनने साजरा केला द ड्रामा कंपनीच्या सेटवर वाढदिवस

​जॅकलिनने साजरा केला द ड्रामा कंपनीच्या सेटवर वाढदिवस

कलिन फर्नांडिसने अल्लादिन या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती हाऊसफुल, मर्डर २, हाऊसफुल २, रेस २ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. किक या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
जॅकलिनचा वाढदिवस ११ ऑगस्टला असतो. तिचा वाढदिवस नुकताच झाला असून हा वाढदिवस ड्रामा कंपनीच्या सेटवर सगळ्यांनी मिळून साजरा केला. जॅकलिनचा ए जेंटलमॅन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची सध्या ती एकही संधी सोडत नाहीये. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ती नुकतीच सिद्धार्थ मल्होत्रासोबत द ड्रामा कंपनीच्या सेटवर गेली होती. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांचे परफॉर्मन्स पाहून तिला तिचे हसू आवरत नव्हते. या कार्यक्रमात येऊन तिला खूप आनंद झाला असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते.
द ड्रामा कंपनीच्या टीमने जॅकलिनला खूपच चांगले सरप्राईज दिले. जॅकलिनचा वाढदिवस नुकताच झाला असल्याने या कार्यक्रमाच्या टीमने तिला एक खूप छान सरप्राईज दिले. त्यांनी कार्यक्रमाच्या सेटवर तिच्यासाठी केक मागवला होता. हा केक पाहून जॅकलिन खूपच खूश झाली होती. हा केक पाहून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिला आनंद झाला होता. तिने द ड्रामा कंपनीच्या टीमसोबत केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला. या वेळी मिथुन चक्रवर्ती, अली असगर, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, संकेत भोसले, सुगंधा मिश्रा हे ड्रामा कंपनी या कार्यक्रमातील मंडळी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित होते. 

Also Read : जॅकलीन फर्नांडिसचा नवा हॉट लूक तुम्ही बघितला काय? नसेल तर पहा!!

Web Title: Jacqueline celebrates birthday of The Drama Company set