"काम करणं कठीण आहे, पण...", पहिल्या किमोथेरेपीनंतर शूटवर परतली हिना खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 10:55 IST2024-07-16T10:52:25+5:302024-07-16T10:55:04+5:30

Hina Khan : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक हिना खान (Hina Khan) तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्टच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण आहे, पण हिना ज्या धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे.

"It's hard to work, but...", Hina Khan returned to the shoot after the first chemotherapy | "काम करणं कठीण आहे, पण...", पहिल्या किमोथेरेपीनंतर शूटवर परतली हिना खान

"काम करणं कठीण आहे, पण...", पहिल्या किमोथेरेपीनंतर शूटवर परतली हिना खान

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक हिना खान (Hina Khan) तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्टच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण आहे, पण हिना ज्या धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हसतमुख चेहरा आणि अतूट धैर्याने कर्करोगाचा सामना करणाऱ्या हिना खानने चाहत्यांसाठी एक आदर्श ठेवला आहे. काही दिवसांपूर्वी हिना खानची पहिली किमोथेरपी झाली होती आणि आता ती सेटवर परतली आहे.

किमोथेरपीनंतर काही दिवसांनी कामावर परतल्याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची संपूर्ण टीम तिला कशी साथ देत आहे हे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. आजारपणामुळे हिना खानला तिचे केस कापावे लागले आणि आता कामावर परतल्यानंतर तिने विगच्या मदतीने तिचा मेकओव्हर केला.

हिना खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या टीममधील एक सदस्य किमोथेरपीमुळे आलेले निशाण लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत हिना खानने लिहिले की, 'कॅन्सरची माहिती मिळाल्यानंतर हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. हा काळ फार कठीण आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही एखाद्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत असाल. अभिनेत्री पुढे लिहिते, 'तुमच्या कठीण दिवसांवर विश्रांती घ्या आणि तुमच्या चांगल्या दिवसांवर तुमचे जीवन मनमोकळेपणाने जगा. या दिवसांना महत्त्व द्या. हा बदल स्वीकारा आणि या बदलाला सामान्य समजा.

अनेक कलाकारांनी दिले प्रोत्साहन
हिना खानने तिच्या कॅन्सरची बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने सांगितले होते की हा काळ नक्कीच कठीण आहे, पण तिला धैर्याने आणि पूर्ण आशेने सामोरे जायचे आहे. हिना खानच्या व्हिडिओवर कलाविश्वातील अनेक स्टार्सनी खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. दलजीत कौर, अदा खान, गौहर खान, हिमांशी खुराना, गीता फोगट यांनी हिना खानच्या व्हिडिओवर कमेंट करून अभिनेत्रीला प्रोत्साहन दिले आहे.

Web Title: "It's hard to work, but...", Hina Khan returned to the shoot after the first chemotherapy