"आता २० वर्षाहून जास्त झाले आणि हा...", रुपाली भोसलेची कुशल बद्रिकेसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:23 IST2024-10-23T13:21:36+5:302024-10-23T13:23:06+5:30

Rupali Bhosle And Kushal Badrike : रुपाली भोसले हिने इंस्टाग्रामवर कुशल बद्रिकेसोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

"It's been more than 20 years now and this...", Rupali Bhosle's special post for Kushal Badrike | "आता २० वर्षाहून जास्त झाले आणि हा...", रुपाली भोसलेची कुशल बद्रिकेसाठी खास पोस्ट

"आता २० वर्षाहून जास्त झाले आणि हा...", रुपाली भोसलेची कुशल बद्रिकेसाठी खास पोस्ट

अभिनेत्री रुपाली भोसले मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिने या मालिकेत संजनाची ग्रे शेड भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिने आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, यात तिने कुशल बद्रिकेबद्दल लिहिले आहे.

रुपाली भोसले हिने इंस्टाग्रामवर कुशल बद्रिकेसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, नागपूर एअरपोर्टला अचानक मला हा माझा सहकलाकर भेटला. एकमेकांचे कौतुक करत होतो आणि अभिमान वाटत होता… माझे पहिले व्यावसायिक नाटक केले त्यात कुशल बद्रिके होता. त्याला आता २० वर्षाहून जास्त झाले आणि हा मुलगा जरा सुद्धा बदलला नाही पण या मुलाने जे कही काम केल आहे ते कमाल आहे.



टायमिंगचे कमाल सेन्स असलेला कलाकार. हाडामासाचा कलाकार आहे. मी करियरची सुरुवात या कमाल कलाकारासोबत केली याचा आनंद आहे. कुशल तुझा अभिमान वाटतो. खूप खूप शुभेच्छा. P.S - @sonalee18588 तुझ्या सोबत चा फोटो राहीला पण परत भेटलो की नक्की क्लिक करू, असे रुपालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

Web Title: "It's been more than 20 years now and this...", Rupali Bhosle's special post for Kushal Badrike