"बाप होऊन ४ वर्ष झाली, कळतच नाहीये की...", संकर्षण कऱ्हाडेनं मुलांचे फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:30 IST2025-06-29T16:29:49+5:302025-06-29T16:30:16+5:30

Sankrashan Karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहेत.

"It's been 4 years since I became a father, I still don't realize...", Sankarshan Karahade wrote in a post sharing photos of his children | "बाप होऊन ४ वर्ष झाली, कळतच नाहीये की...", संकर्षण कऱ्हाडेनं मुलांचे फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

"बाप होऊन ४ वर्ष झाली, कळतच नाहीये की...", संकर्षण कऱ्हाडेनं मुलांचे फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankrashan Karhade) नेहमी चर्चेत येत असतो. त्याने सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातून रसिकांच्या मनावर छाप सोडली आहे. यासोबतच संकर्षण उत्तम लेखकही आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग खूप मोठा आहे आणि तो चाहत्यांसोबत अपडेट्सही शेअर करत असतो. नुकतेच त्याने मुलांसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने मुलांसोबतचे फोटो शेअर केला आहे. त्याला जुळी मुलं आहेत. मुलाचं नाव आहे सर्वज्ञ तर मुलीचं नाव आहे स्रग्वी. त्याने त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, सर्वज्ञ स्रग्वीचा बाप होउन ४ वर्षं झाली… कळतच नाहीये ते मोठे होतायेत का मी लहान होतोय… या फोटोत संकर्षण त्याचा मुलगा आणि मुलीचे लाड करताना दिसतो आहे. त्याच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोवर सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. स्पृहा जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.


संकर्षण कऱ्हाडे हा एक उत्तम अभिनेता आहेच. त्यासोबतच तो एक उत्तम कवी, लेखक आणि सूत्रसंचालक आहे. सध्या रंगभूमीवर संकर्षण कऱ्हाडेच्या  कुटूंब किर्रतन या नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. याशिवाय संकर्षण झी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनिअर्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.

Web Title: "It's been 4 years since I became a father, I still don't realize...", Sankarshan Karahade wrote in a post sharing photos of his children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.