अबब...! राखी सावंतवर झाला पैशांचा पाऊस, मालामाल झाली ड्रामा क्वीन?, व्हिडीओत झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 11:48 IST2021-03-19T11:48:01+5:302021-03-19T11:48:19+5:30

Rakhi Sawant Viral Video: ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून चाहते हैराण झाले आहेत.

It rained money on Rakhi Sawant, it became Drama Queen ?, it was revealed in the video | अबब...! राखी सावंतवर झाला पैशांचा पाऊस, मालामाल झाली ड्रामा क्वीन?, व्हिडीओत झाला खुलासा

अबब...! राखी सावंतवर झाला पैशांचा पाऊस, मालामाल झाली ड्रामा क्वीन?, व्हिडीओत झाला खुलासा

ड्रामा क्वीन राखी सावंत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. बिग बॉस १४मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी हटक्या गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे. राखीवर पैशांचा पाऊस पडला. आजूबाजूला पैसे पडलेला राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.


खरेतर राखी सावंतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिच्या आजूबाजूला पैसे पडलेले दिसत आहेत. राखीवर पैशांचा पाऊस पडलो आहे. लोक तिच्या या व्हिडीओवर खूप रिएक्शन देत आहे. मात्र तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हा व्हिडीओ राखीने शूटिंग सेटवरून शेअर केला आहे.

राखी सध्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या एका वेबसीरिजचे शूटिंग करते आहे. या सीरिजचे नाव आहे ‘तवायफ-बाज़ार ए हुस्न’ आणि याचे दिग्दर्शन मारुख मिर्झा करत आहेत.


राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. लोक राखीला नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत. बिग बॉस १४मध्ये भलेही राखी सावंत विजेती होऊ शकली नाही पण तिने योग्य वेळी निर्णय घेऊन एक चांगली रक्कम घेऊन ती या शोमधून बाहेर पडली आहे. तिने आपल्या पर्सनालिटीने लोकांचे मन जिंकले आहे.

Web Title: It rained money on Rakhi Sawant, it became Drama Queen ?, it was revealed in the video