'पक पक पकाक'मधील साळूला आता ओळखणं झालंय कठीण, करतेय 'या' मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 07:00 AM2021-09-11T07:00:00+5:302021-09-11T07:00:00+5:30

पक पक पकाक या चित्रपटातील साळूच्या भूमिकेतून या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते.

It is difficult to recognize actress of 'Pak Pak Pakak' now, working in 'this' series | 'पक पक पकाक'मधील साळूला आता ओळखणं झालंय कठीण, करतेय 'या' मालिकेत काम

'पक पक पकाक'मधील साळूला आता ओळखणं झालंय कठीण, करतेय 'या' मालिकेत काम

googlenewsNext

२००५ साली पक पक पकाक हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भुत्या अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारला होता तर चित्रपटात साळूचे पात्र अभिनेत्री नारायणी शास्त्रीने निभावले होते. सध्या ती आपकी नजरोंने समजा या मालिकेत काम करते आहे. २०१५ साली तिने फॉरेनर बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केले होते आणि ही बाब तिने जवळपास दीड वर्षे सर्वांपासून लपवून ठेवली होती. मात्र अखेर याचा खुलासा झाला होता.

अभिनेत्री नारायणी शास्त्री ही हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. यासोबतच ती थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. नारायणीचा १६ एप्रिल १९७४ रोजी पुण्यात जन्म झाला. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथेच अभिनयाचे वेध लागले आणि “क्युंकी सास भी कभी बहू थी” या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिने या मालिकेत केसरची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप लोकप्रिय झाल्यानंतर अनेक हिंदी मालिकेत तिला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.

कुसुम, पिया का घर, नमक हराम, रिषतों का चक्रव्यूह, फिर सुबह होगी, लाल ईश्क अशा अनेक टीव्ही मालिकेत ती झळकली. हिंदी मालिकेत काम करत असली तरी मराठी ही भाषाही तिला चांगलीच अवगत होती.


पक पक पकाक नंतर ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात तिने प्रमुख भूमिका केली. घात, चांदणी बार, मुंबई मेरी जान, न घर के ना घाट के या हिंदी चित्रपटात देखील तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. 


२०१५ साली तिने परदेशी बॉयफ्रेंड असलेल्या स्टीवन ग्रेवर सोबत गुपचूप लग्न केले. याबाबत तिने बरेच दिवस मौन बाळगले होतो.

‘ मी माझे लग्न जगजाहीर करणार नव्हते, माझे त्याच्यासोबत प्रेम होते आणि म्हणूनच मी लग्न केले’ असे तिने नंतर सांगितले होते. आता ती आपल्या पतीसोबत मुंबईतच स्थायिक झाली आहे.  

Web Title: It is difficult to recognize actress of 'Pak Pak Pakak' now, working in 'this' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.