'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील नेहा अनुष्का आहे की नेहा?, खुद्द यशने केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 13:07 IST2022-11-12T13:07:03+5:302022-11-12T13:07:34+5:30

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Is Neha Anushka or Neha in 'Majhi Tuzi Reshimagath' serial?, Yash himself disclosed this | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील नेहा अनुष्का आहे की नेहा?, खुद्द यशने केला हा खुलासा

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील नेहा अनुष्का आहे की नेहा?, खुद्द यशने केला हा खुलासा

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी यश आणि नेहा यांचा अपघात होतो आणि या अपघातात नेहाचे निधन होते असा सगळ्यांचा समज होतो. त्यानंतर मालिकेत नेहासारखी दिसणारी अनुष्काची एन्ट्री होते. ती नेहा आहे की अनुष्का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात खुद्द यश याबाबतचा उलगडा करताना दिसतो आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, अनुष्का की नेहा ? तुम्हाला काय वाटतंय ? लवकरच....माझी तुझी रेशीमगाठ.

या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, प्रार्थना श्रेयसला विचारताना दिसत आहे की, कशी वाटतेय अनुष्का. त्यावर तो म्हणाला की, माझ्यासाठी माझी ती नेहाच आहे. तुमच्यासाठी कोण आहे? हा व्हिडीओतून श्रेयसने प्रेक्षकांना ती नेहा असल्याची हिंट दिली आहे.


दरम्यान, नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात यश आणि अनुष्काचा भाऊ मारामारी करताना दिसत आहे. मारामारी करता करता परी यशला सांगते की तू मारामारी करू नको नाहीतर मी आईकडे जाईन. त्यानंतर यश मारामारी थांबवतो. तितक्यात तिथे अनुष्का येते आणि त्यांच्यातील मारामारी थांबवते. भावाला यशला सॉरी बोलायला सांगते. तितक्यात तिथून यश निघून जातो. यश आणि नेहाची थोडक्यात चुकामूक होते. 

Web Title: Is Neha Anushka or Neha in 'Majhi Tuzi Reshimagath' serial?, Yash himself disclosed this