ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 15:11 IST2020-11-19T15:10:11+5:302020-11-19T15:11:38+5:30

मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले आणि ते क्षणात व्हायरल झाले.

ips mohita sharma kbc 12 crorepati got 2 masala sachets in 1 maggi packet fans comments | ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि...

ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि...

ठळक मुद्देकेबीसी 12 मध्ये  काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकले होते. यानंतर आयपीएस मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकलेत.

कौन बनेगा करोडपती 12’ या शोमध्ये आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा यांनी 1 कोटी रूपये जिंकलेत. 1 कोटी जिंकणा-या मोहितांचे नाव साहजिकच सध्या जाम चर्चेत आहेत. यादरम्यान मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले आणि ते क्षणात व्हायरल झाले. इतकेच नाही तर त्यांच्या या ट्विटवर तितक्याच मजेदार प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. ऊपरवाला जब देता है तो छप्पर फाडकर देता है..., असे काय काय कमेंट्स लोकांनी यावर दिल्या.

आता मोहिता शर्मा यांनी काय ट्विट केले, याबद्दल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल. पण त्याआधी मोहिता शर्मा यांचे ट्विटर हँडल व्हेरिफाईड नाही. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटवरून केलेले हे ट्विट त्यांनीच केले, असा दावा आम्ही करत नाही. तर मोहिता र्श्मा यांनी मॅगी पॅकेट व मसाल्याचा एक फोटो शेअर करत पोस्ट केली. ‘केबीसी 12 जिंकल्यानंतर एका मॅगी पाकिटात 2 मसाला पाऊच मिळालेच. नशीब इतके मेहरबान होईल, असा विचारही केला नव्हता. आज देवाची माझ्यावर मोठी कृपा आहे,’ असे मोहिता यांनी लिहिले.

या पोस्टवर लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स दिल्यात. देवाची सर्वांवर अशीच कृपा असू देत, असे एका युजरने यावर लिहिले. ‘किस्मत खुल गई आपकी तो,’ अशी कमेंट एकाने केली. ‘ऊपरवाला जब भी देता है छप्पर फाड के देता है...’, असे एकाने युजरने लिहिले.


 
केबीसी 12 मध्ये  काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकले होते. यानंतर आयपीएस आॅफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकलेत.  हॉटसीटवर त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि ज्ञानाने अमिताभ बच्चन यांचे मन जिंकले. 3,20,000 रुपये जिंकेपर्यंत त्यांनी एकही लाईफ लाईन वापरली नव्हती. 1 कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी त्यांनी एक्स्पर्टची मदत घेत  उत्तर दिले.  7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

Web Title: ips mohita sharma kbc 12 crorepati got 2 masala sachets in 1 maggi packet fans comments