​आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर अॅरन डब्ल्यू. रीड पोरस मालिकेत एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 08:31 AM2018-01-22T08:31:54+5:302018-01-22T14:01:54+5:30

​आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर अॅरन डब्ल्यू. रीड पोरस मालिकेत पर्शियन योद्धयाची भूमिका करणार आहे. पोरस या भारतात बनलेल्या पहिल्या ...

International wrestler and body builder Aaron W. Entry in the Reed Poros series | ​आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर अॅरन डब्ल्यू. रीड पोरस मालिकेत एंट्री

​आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर अॅरन डब्ल्यू. रीड पोरस मालिकेत एंट्री

googlenewsNext
ंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि बॉडी बिल्डर अॅरन डब्ल्यू. रीड पोरस मालिकेत पर्शियन योद्धयाची भूमिका करणार आहे. पोरस या भारतात बनलेल्या पहिल्या जागतिक टीव्ही मालिकेत काम करण्यासाठी अॅरन डब्ल्यू. रीडला घेण्यात आले आहे. या मालिकेस त्यातील दृश्ये, चित्रीकरण आणि अभिनयामुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळते आहे आणि याच्या निर्मात्यांनी या ऐतिहासिक मालिकेस चिरस्मरणीय बनवण्याचा चंग बांधला आहे.

अॅरन डब्ल्यू. रीड या मालिकेत एका पर्शियन योद्ध्याची भूमिका करणार आहे, जो जगातील सर्वात मोठा आणि अजिंक्य योद्धा समजला जात असतो. तो राजा कनिष्क आणि पोरस  यांच्याशी युद्ध करताना दिसणार आहे. हा माजी WWE कुस्तीपटू आणि जगातील सर्वात उंच बॉडी बिल्डर सध्या भारतात असून उंबरगाव येथे वास्तव्यास आहे, जेथे या मालिकेचा सेट उभारण्यात आलेला आहे.

तो येथे चित्रीकरण करण्याबरोबरच सह-कलाकारांसोबत चर्चा करतो आणि जुजबी हिंदी शिकतो आहे. त्याच्या आहाराच्या आणि जिमच्या सुविधा त्यास पुरवल्या जाण्याची दक्षता निर्माते घेत आहेत. असे म्हटले जाते की अॅरन गेल्या वर्षी एका समारंभासाठी मुंबईस आला होता, ज्यात मोठ्या प्रमाणावर जागतिक सहभाग होता. त्याच वेळी निर्मात्यांनी त्यास हेरले होते. तो या भूमिकेत चपखल बसतो आहे. त्याचे संवाद डब करण्यात येणार आहेत. 

पोरस या मालिकेचे बजेट हे जवळजवळ ५०० कोटींच्या घरात असून ही मालिका अतिशय भव्य आहे. पोरस या मालिकेची कथा ख्रिस्तपूर्व ३२६ च्या काळातील आहे. त्यामुळे प्राचीन काळातील वैभव उभे करण्यासाठी आणि तो काळ जिवंत करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या गोष्टीकडे देखील बारकाईने लक्ष दिले जात आहे.

Web Title: International wrestler and body builder Aaron W. Entry in the Reed Poros series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.