'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये येणार रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:29 IST2018-10-17T15:14:44+5:302018-10-17T15:29:26+5:30

'अल्लादिन नाम तो सुना होगा' मालिकेच्या आगामी भागांमध्ये झेन (कुणाल खोसला) अलीझा नावाच्या एका दुष्ट आत्म्याला बोलवण्यात येणार आहे.

Interesting twist in serial alladin naam to suna hoga | 'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये येणार रंजक वळण

'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये येणार रंजक वळण

प्रेक्षकांना जादुई दुनियेच्या जादुई सफरीवर घेऊन जाणारी सोनी सबवरील अल्लादिनने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये झेन (कुणाल खोसला) अलीझा नावाच्या एका दुष्ट आत्म्याला बोलवण्यात येणार आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली असलेला जादुई दिवा मिळवण्यासाठी अलीझा त्याला काही शक्ती प्रदान करणार आहे.

यास्मिन (अवनीत कौर)ची स्मरणशक्तीच पुसून टाकत तिला आणि जीनीला (राशुल टंडन) आपल्या संमोहनाखाली आणण्याचा झेनचा डाव अल्लादिन (सिद्धार्थ निगम) उधळून लावतो. त्यामुळे जाफर (आमिर दळवी) झेनला ठार करणार असतो. मात्र, आपण अलीझा (श्वेता खांडुरी) या दुष्ट शक्तीला पाचारण करून 'चिराग; मिळवू शकतो, असे झेनने सांगितल्यानंतर जाफर त्याला मारण्याचा विचार सोडून देतो.

झेनने बोलावल्यानंतर अलीझा मानवी रुपात येते आणि झेनला एक दुष्ट खतुबा (विंचू) बनवते. या नव्या अवतारातील झेनला अल्लादिनच्या रक्ताची तहान लागते आणि तो दिवा मिळवण्यासाठी निघतो. झेनच्या क्रूर 'खतुबा' अवतारापासून अल्लादिन, जीनी आणि यास्मिन स्वत:ला वाचवू शकतील का? झेनची भूमिका साकारणारा कुणाल खोसला म्हणाला, 'अल्लादिन नाम तो सुना होगा'मध्ये झेनची भूमिका करताना मला फारच मजा येत आहे. खरे सांगायचे तर अल्लादिनच्या सेटवर काम करताना आपण काम करतोय असे वाटतेच नाही इतके इथले वातावरण सकारात्मकता आणि ऊर्जेने भरलेले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या व्यक्तिरेखा आता संकटात आहेत त्यामुळे हे भाग पाहताना ते त्यात गुंतून जातील.

Web Title: Interesting twist in serial alladin naam to suna hoga