सोन्याच्या लूकसाठी या' अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 15:44 IST2018-09-11T15:35:33+5:302018-09-11T15:44:16+5:30

स्टारप्लसवरील सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य नजरला त्यातील रोमांचक कथानक आणि अफलातून व्हीएफएक्ससाठी प्रेक्षकांकडून मान्यता आणि कौतुक प्राप्त होत आहे.

Inspired by this actress for the look of the sonya | सोन्याच्या लूकसाठी या' अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

सोन्याच्या लूकसाठी या' अभिनेत्रीकडून घेतली प्रेरणा

ठळक मुद्देसोन्याची लूकची प्रेरणा 'हम आपके है कौन'मधील माधुरी दीक्षितच्या लूकवरुन घेतली.

स्टारप्लसवरील सुपरनॅचरल फँटसी नाट्‌य नजरला त्यातील रोमांचक कथानक आणि अफलातून व्हीएफएक्ससाठी प्रेक्षकांकडून मान्यता आणि कौतुक प्राप्त होत आहे. यातील केवळ ग्राफिक्सच आकर्षक नसून ह्या शोमध्ये काही ग्लॅमरस पेहरावही पाहायला मिळाले आहेत, जे ह्या शोचे स्टाईल स्टेटमेंट बनले आहेत. 

अभिनेत्री सोन्या नजरमध्ये रूबीची व्यक्तिरेखा साकारत असून यातील मेहंदी सोहळ्‌यासाठी ती सुंदर लेहेंगा परिधान केलेली दिसून येईल. तिच्या ह्या लूकसाठी लोकप्रिय चित्रपट ‘हम आपके है कौन’मधील माधुरी दीक्षितच्या लूकवरून प्रेरणा घेण्यात आली आहे. सोन्या म्हणाली, “मला माधुरी दीक्षित अतिशय आवडते. ती अतिशय सुंदर आहे आणि माझ्यासाठी प्रेरणासुद्धा. तिच्या लेहेंग्यासारखा लेहेंगा घालताना मला खूप छान वाटतंय. हिरव्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावरील बारीक नक्षीकामासह मला अगदी राजेशाही वाटतंय. ह्या शोमधील माझा हा आत्तापर्यंतच सर्वोत्तम लूक आहे. माधुरीसारखाच लूक असावा असे निर्मात्यांचा मनात तर नव्हते पण तरीही तो लूक तसा झाला आहे याचा मला आनंद आहे.” ह्या शोमध्ये तरूण डायन साकारण्याबद्दल सोन्या प्रकाशझोतात आली. ती मूळची न्यूझीलॅंड येथील असून लहानपणापासूनच तिला बॉलीवूडची आवड होती. ती माधुरी दीक्षितची मोठी चाहती असून आपल्या मालिकेत माधुरीचा लूक घेताना तिला खूप छान वाटतंय.

‘नजर’ मालिकेत प्रेक्षकांना वारंवार अनपेक्षित धक्के बसत असतात आणि बरेचदा अंगावर भीतीचा काटा आणणाऱ्या  अमानवी शक्तींचे दर्शन घडत असते. मोहना ही डायन आपली मुलगी रूबी आणि अंश राठोड यांचा विवाह कधी होत आहे, याची आतुरतेने वाट बघत असते. कारण तसे झाल्यास तिला तिच्या शक्ती परत मिळणार असतात. पण अंशच्या आयुष्यात पियचाही प्रवेश झाला आहे. प्रेक्षकांना आता सुष्ट-दुष्टांमधील तीव्र संघर्ष पाहायला मिळणार असून त्यामुळे त्यांच्यातील उत्कंठा वाढली आहे.

Web Title: Inspired by this actress for the look of the sonya

टॅग्स :Nazarनजर