फॅनच्या हास्यासाठी 'इन्स्पेक्टर मंजू'ने केला सातारा ते मुंबई प्रवास, श्रियाला भेटून पाणावले डोळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:51 IST2025-10-06T17:50:23+5:302025-10-06T17:51:03+5:30

Inspector Manju Serial : 'इन्स्पेक्टर मंजू' मालिकेत मंजूला गोळी लागल्यापासून श्रिया अस्वस्थ होत नेहमी साताऱ्याला जाण्याचा हट्ट आईबाबांकडे करत असते. तिला बरं वाटावं म्हणूनच मालिकेतील कलाकार सत्या आणि मंजूने थेट तिच्या घरी पोहोचून खास सरप्राईज दिलं.

'Inspector Manju' traveled from Satara to Mumbai for the laugh of a fan, met Shriya and got teary-eyed | फॅनच्या हास्यासाठी 'इन्स्पेक्टर मंजू'ने केला सातारा ते मुंबई प्रवास, श्रियाला भेटून पाणावले डोळे 

फॅनच्या हास्यासाठी 'इन्स्पेक्टर मंजू'ने केला सातारा ते मुंबई प्रवास, श्रियाला भेटून पाणावले डोळे 

सन मराठीवरील 'इन्स्पेक्टर मंजू' (Inspector Manju Seria) या मालिकेला प्रेक्षकांकडून अफाट प्रतिसाद मिळत आहे. याआधी ८४ वर्षांचे आजोबा सत्या-मंजूची गोष्ट खरी आहे असं समजून थेट सेटवर पोहोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेची गोष्ट खरी आहे असं समजून सत्या- मंजूला भेटण्याचा हट्ट करणारी चाहती समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीत राहणारी श्रिया नाईक ही सत्या-मंजूची मोठी चाहती आहे. श्रियाला डाउन सिंड्रोम हा आजार आहे. ती या मालिकेतील पात्रांना आपले खरे मित्र समजते. मालिकेत मंजूला गोळी लागल्यापासून श्रिया अस्वस्थ होत नेहमी साताऱ्याला जाण्याचा हट्ट आईबाबांकडे करत असते. तिला बरं वाटावं म्हणूनच मालिकेतील कलाकार सत्या आणि मंजूने थेट तिच्या घरी पोहोचून खास सरप्राईज दिलं. कलाकारांना समोर पाहताच श्रिया आनंदाने भारावून गेली. यावेळी सत्या-मंजूने तिला एक सुंदर फोटो फ्रेम गिफ्ट केली ज्यात त्यांचा आणि श्रियाचा फोटो आहे. हा क्षण श्रियासाठी अविस्मरणीय ठरला.

श्रिया बद्दल सांगताना तिचे बाबा यशवंत नाईक म्हणाले की, "श्रिया सन मराठीवरील सर्व मालिका बघते. तिला सगळ्यात जास्त 'इन्स्पेक्टर मंजू' ही मालिका आवडते. जेव्हाही आम्ही तिला घरात ओरडतो तेव्हा ती आम्हाला म्हणते मी माझ्या सत्या- मंजूकडे जाईन. मालिकेत मंजूला गोळी लागण्याचा सीन पाहून श्रिया घाबरली. ती बेचैन होऊन मला साताराला जायचं आहे हा हट्ट तिने आमच्याकडे केला. २ वर्ष न चुकता श्रिया ही मालिका बघते. रात्री ८ वाजले की, ती घराबाहेर कधीच थांबत नाही. या मालिकेतील मंजूमुळे ती आणखीन खंबीर झाली आहे. आज तिचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे असं मी म्हणेन हा आनंद तिच्यासाठी गगनात न मावण्यासारखा आहे. तिचं हे हास्य पाहून आम्ही समाधानी आहोत."

''आज प्रत्यक्षात तिला भेटून मी भरून पावले...''

श्रियाच्या या प्रेमावर मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, "मंजूला मिळणार हे प्रेम पाहून मी निशब्द आहे. सातारा ते मुंबई हा प्रवास पहिल्यांदा फार वेगळा होता. कारण आज मी आणि सत्या आमच्या एका फॅनला भेटण्यासाठी मुंबईला आलो आहोत. श्रिया आमच्या मालिकेतील प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम करते. प्रत्येक भाग तिने बारकाईने पहिला आहे. ती म्हणाली, मम्मीसाहेबांना मी चांगलाच धडा शिकवेन. हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. कारण ती मालिकेत इतकी गुंतली आहे.  ती डाऊन सिंड्रोम या आजारात आहे आणि या सगळ्यात ती मंजूला तिची खास मैत्रीण मानते. हे सगळं ऐकून आणि आज प्रत्यक्षात तिला भेटून मी भरून पावले. श्रियाचा हा आनंद असाच रहावा हीच बाप्पाकडे माझी प्रार्थना आहे आणि 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेक्षकांचं हे प्रेम कायम रहावं."

Web Title : डाउन सिंड्रोम से पीड़ित फैन से मिलीं 'इंस्पेक्टर मंजू', पूरी की इच्छा

Web Summary : 'इंस्पेक्टर मंजू' की बड़ी प्रशंसक, डाउन सिंड्रोम से पीड़ित श्रिया, कलाकारों से मिलना चाहती थी। कलाकारों ने घर पर चौंका दिया। श्रिया का सपना सच हुआ, परिवार में खुशी आई।

Web Title : 'Inspector Manju' Meets Fan with Down Syndrome; Fulfills Her Wish

Web Summary : Down syndrome patient Shriya, a huge fan of 'Inspector Manju', wished to meet the cast. Actors surprised her at home. Overwhelmed, Shriya's dream came true, bringing joy to her family.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.