शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
By कोमल खांबे | Updated: December 28, 2025 09:13 IST2025-12-28T09:12:33+5:302025-12-28T09:13:04+5:30
कांचीने नुकतंच नवं घर घरेदी केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
'इंद्रायणी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे कांची शिंदे. मालिकेत इंदूची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. कांचीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. मालिकेचे अपडेट्स शेअर करण्याबरोबरची ती वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते. कांचीने एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
कांचीने नुकतंच नवं घर घरेदी केलं आहे. महाराष्ट्रात कांचीने तिचं हक्काचं घर घेतलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कांची तिच्या आईसोबत दिसत आहे. घराच्या बाल्कनीत कांची आणि तिची आई उभी आहे. कांचीच्या हातात घराची किल्ली दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये "आमचं हक्काचं घर" असं म्हटलं आहे. २७ डिसेंबर रोजी कांचीने तिचं हे स्वत:चं घर खरेदी केलं आहे. कांचीला सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंटमध्ये शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलं आहे.
कांची शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री असण्यासोबतच कांची उत्तम लावणी नृत्यांगणाही आहे. ती लावणीचे शो करते आणि वर्कशॉपही घेते. लावणीचे अनेक व्हिडीओही कांची तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत कांची दिसली होती. यामध्ये तिने चमकी ही भूमिका साकारली होती.