‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मालिकेत इंदिरा कृष्णन यांची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 11:15 IST2018-10-18T10:08:02+5:302018-10-18T11:15:00+5:30

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेला जणार आहे. विनोदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांचाही या मालिकेत प्रवेश होणार आहे.

Indira Krishnan's entry in the serial 'How, Mr Panchal?' | ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मालिकेत इंदिरा कृष्णन यांची एंट्री

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’मालिकेत इंदिरा कृष्णन यांची एंट्री

ठळक मुद्दे इंदिरा कृष्णन या मणिंदरची आत्याबाईच्या भूमिकेत आहेत

‘स्टार भारत’वरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ ही सर्वात लोकप्रिय विनोदी मालिका बनली आहे.ही मालिका प्रेक्षकांना खळखळून हसविण्यात कधीच चुकत नाही. आता या मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेला जणार आहे. त्यानंतर मालिकेत मणिंदरच्या पाच मुलांचा समावेश होईल. इतकेच नव्हे, तर विनोदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांचाही या मालिकेत प्रवेश होणार आहे.

इंदिरा म्हणाल्या, “मी प्रथमच विनोदी मालिकेत भूमिका रंगवीत असून त्याबद्दल मी खूपच उत्सुक बनले आहे. वास्तव जीवनात मी तशी विनोदी बुध्दी असलेली आहे; पण प्रेक्षकांनी माझी विनोदी अभिनयाची शैली अजून पाहिलेली नाही. आता या मालिकेतील भूमिकेद्वारे मी प्रेक्षकांना माझ्यातील विनोदी अभिनयाचे अंग दाखवू शकेन, याचा मला आनंद होत आहे.” 

या मालिकेत इंदिरा कृष्णन या मणिंदरची आत्याबाईच्या भूमिकेत आहेत. ही आत्या स्वभावाने कडक असते आणि तिला फाजिलपणा अजिबात खपत नाही. प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच पसंत पडेल.

छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून या वाहिनीवरील ती सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेत कन्हैय्याची भूमिका साकारणा-या मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे

Web Title: Indira Krishnan's entry in the serial 'How, Mr Panchal?'