इंडियन आयडॉल जिंकणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंतची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 22:13 IST2024-07-28T22:12:55+5:302024-07-28T22:13:39+5:30

'बिग बॉस मराठी ५'मध्ये मराठमोळा गायक अभिजीत सावंतची शानदार एन्ट्री झालीय (bigg boss marathi 5)

Indian Idol winner Abhijit Sawant's entry in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh | इंडियन आयडॉल जिंकणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंतची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री

इंडियन आयडॉल जिंकणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंतची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री

 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिजीत सावंतची एन्ट्री झालीय. इंडियन आयडॉलचा पहिला सीझन अभिजीतने जिंकला होता. मोहब्बते लुटाऊंगा या गाण्यावर अभिजीतने  'बिग बॉस मराठी ५'मध्ये शानदार एन्ट्री केलीय. अभिजीतने घरात एन्ट्री केल्यावर रितेशने त्याच्या फिट अँड फाईन असण्याचं आणि दिसण्याचं कौतुक केलं. अभिजीत सावंत सुरांची जादू दाखवली होती. आता अभिजीत  'बिग बॉस मराठी ५'मध्ये काय कल्ला करणार हे पाहायचं आहे.

 'बिग बॉस मराठी ५'मध्ये अभिजीत सावंतची एन्ट्री

अभिजीत सावंतने  'बिग बॉस मराठी ५' मध्ये एन्ट्री केली. अभिजीतला रितेशने सुंदरतेचं रहस्य विचारल्यावर तो म्हणाला. माझा चेहरा हसरा आहे. अशाप्रकारे माझा रियाज दांडगा आहे. सूर वरचा असू दे की खालचा चांगला लावता येतो असा टोमणाही त्याने मारला. अभिजीत सावंतची घरात एन्ट्री होताच सर्व सदस्यांनी त्याला ओळखलं आणि कौतुक केलंय.


आतापर्यंत या स्पर्धकाची घरात एन्ट्री

'बिग बॉस मराठी ५' मध्ये आतापर्यंत अभिजीत सावंत यांचा सहभाग मोजता सात स्पर्धकांची एन्ट्री झालीय. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता निखिल दामले, सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल, पॅडी कांबळे, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण  'बिग बॉस मराठी ५' मध्ये दाखल झाले आहेत. रितेश देशमुख हा सीझन होस्ट करतोय.

Web Title: Indian Idol winner Abhijit Sawant's entry in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh