कानपूरचा वैभव गुप्ता ठरला Indian idol 14 चा विजेता; या कामासाठी वापरणार प्राइज मनीची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 08:47 IST2024-03-04T08:45:06+5:302024-03-04T08:47:02+5:30

वैभव गुप्ता इंडियन आयडॉल 14 चा विजेता झाला असून तो मिळालेल्या प्राईज मनी मधून स्वतःचं स्पप्न पूर्ण करणार आहे

Indian Idol Season 14 wnner vaibhav gupta from Kanpur | कानपूरचा वैभव गुप्ता ठरला Indian idol 14 चा विजेता; या कामासाठी वापरणार प्राइज मनीची रक्कम

कानपूरचा वैभव गुप्ता ठरला Indian idol 14 चा विजेता; या कामासाठी वापरणार प्राइज मनीची रक्कम

लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो इंडियन आयडॉल 14 चा काल रविवारी, 3 मार्चला शानदार ग्रँड फिनाले झाला. इंडियन आयडॉल 14 चा विजेता ठरला वैभव गुप्ता. या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सुभदीप दास, पियुष पनवार, अनन्या पाल, अंजना पद्मनाभन आणि आद्य मिश्रा हे स्पर्धक सहभागी होते. या सर्वांवर मात करुन वैभवने इंडियन आयडॉल 14 चं विजेतेपद पटकावलं आहे.

वैभव गुप्ताने इंडियन आयडॉल 14 चं विजेतेपद पटकावल्यावर त्याला 25 लाखांचे रोख बक्षीस आणि एक आलिशान मारुती सुझुकी ब्रेझा कार मिळाली.  शो जिंकल्यानंतर वैभवने जिंकलेल्या रकमेचे काय करणार हे उघड केले. पिंकविलाशी बोलताना तो म्हणाला, "शोमधून जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेतून स्वतःचा स्टुडिओ निर्माण करण्याची इच्छा आहे. जिथे मी गाणी रेकॉर्ड करू शकेन आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध ट्रॅक तयार करू शकेन."

वैभव पुढे म्हणाला, "माझ्या प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि मी नेहमीच त्यांचे मनोरंजन करू शकेन अशी माझी इच्छा आहे. स्टुडिओ असणे हे नेहमीच स्वप्न राहिले आहे आणि या बक्षीस रकमेमुळे मी ते सहज साध्य करू शकतो." इंडियन आयडॉल 14 हा शो 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरु झाला. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुमारे पाच महिने हा शो चालला.

Web Title: Indian Idol Season 14 wnner vaibhav gupta from Kanpur