प्रियकराच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आइडल' फेम रेणू नागर ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 13:50 IST2020-08-29T13:50:01+5:302020-08-29T13:50:31+5:30

गायिका रेणू नागर सध्या अतिदक्षता विभागात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

'Indian Idol' fame Renu Nagar admitted to ICU after boyfriend's suicide, in critical condition | प्रियकराच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आइडल' फेम रेणू नागर ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आइडल' फेम रेणू नागर ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

सिंगिग रिएलिटी शो 'इंडियन आइडल'मध्ये सहभागी झालेली गायिका रेणू नागर सध्या अतिदक्षता विभागात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. रेणू नागरच्या विवाहीत प्रियकराने आत्महत्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समल्यानंतर रेणू नागरला मानसिक धक्का बसला आणि ती जमिनीवर कोसळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.

महिन्याभरापूर्वी रेणू नागर आणि तिचा प्रियकर रवी नट आपले घर सोडून निघून गेले होते. त्यावेळी रेणूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा रवीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, रेणूचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी रवी नट याला सोडले. त्यानंतर ते अल्वरला परतले होते.

दरम्यान, रवी नट याने विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर सायंकाळी उशिरा ७ वाजण्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरु असतानाच रवी नटचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर रेणू मानसिक तणावाखाली गेली. त्यातच ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सध्या रेणूची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.



विवाहीत आणि तीन मुलांचा पिता असलेल्या रवी नटशी रेणूचे प्रेमसंबंध होते. भरतपूरचा रहिवासी असलेला रवी रेणूला गेल्या तीन वर्षांपासून तिच्या घरी तबला शिकवण्यासाठी येत होता. अल्वरमध्ये एका भाड्याच्या घरात तो राहत होता. यावेळी या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ३० जून रोजी हे दोघेही आपापल्या घरातून निघून गेले होते.

Read in English

Web Title: 'Indian Idol' fame Renu Nagar admitted to ICU after boyfriend's suicide, in critical condition